शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंगसाठी पाच लाख रुपये घेणारा ठाण्यातील ‘तो’ खासदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 01:36 IST

जितेंद्र आव्हाडांचा सवाल । भूमिका जाहीर करण्याचे खासदारांना आवाहन

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्याने हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे; मात्र ठाण्यातील चारपैकी एका खासदाराने या होर्डिंगच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा ’अविचारी’ खासदार कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग पडले आहे. या होर्डिंगची उभारणीच बेकायदेशीरपणे करण्यात आलेली आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने होर्डिंग उभारण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्यांची उंची, रंगसंगती, डोळ्यांवर येणारा तणाव आदींसंदर्भात विशिष्ट निकष न्यायालयाने घालून दिले आहेत; मात्र ठाण्यातील एकाही ठिकाणी होर्डिंगचे हे नियम पाळण्यात येत नाहीत. बुधवारी दुर्घटनाग्रस्त झालेले हे होर्डिंग उभारण्यासाठी एका खासदाराने पाच लाख रु पयांचा हप्ता घेतला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांनी हा हप्ता भागीदार म्हणून घेतला की, अन्य कोणत्या प्रकारे घेतला, हे माहीत नाही.ठाण्यात कुमार केतकर, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे आणि राजन विचारे हे चार खासदार राहतात. केतकर यांच्याशी आपले बोलणे झाले असून ते पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराशी आपला संबंध नसल्याचे जाहीर करणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचा काही संबंध नसल्याचे जाहीर करावे. विनय सहस्रबुद्धे यांनी विवेकबुद्धीने आपली भूमिका जाहीर करावी. राजन विचारे यांनीही चुकीचा विचार करू नये. त्यांनीही पूर्ण विचारांती आपली भूमिका सांगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.चार दिवसांत डम्पिंग बंद न झाल्यास आंदोलनवागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमुळे या भागात राहणाऱ्या सुमारे ३० टक्के नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चार दिवसांत हे डम्पिंग ग्राउंड बंद न केल्यास ते आपण बंद पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पर्यावरणाचे कोणतेही निकष न पाळता डम्पिंग ग्राउंड सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.घरखरेदीत जीएसटीसह एलबीटीचीही वसुलीजीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आलेली आहे; मात्र ठाणे शहरात घरखरेदी करताना जीएसटी आणि एलबीटी असे दोन्ही कर भरावे लागत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडून एलबीटी घेण्यात आलेली आहे, त्यांना त्यांचे पैसे परत करावेत. तसेच, एलबीटी पूर्णत: बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडlok sabhaलोकसभाMember of parliamentखासदार