शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘विनयभंग गुन्ह्यामागील नेमका शकुनी कोण?’ पाच गुन्हे दाखल करून तडीपारीचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:13 IST

Jitendra Awhad: अशा प्रकारच्या गुन्ह्यात आपल्याला गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, याचे दु:ख आहे. यामागे कोण शकुनी मामा आहे, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली.

ठाणे : विनयभंगाच्या गुन्ह्यात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळाल्याचा कोणताही आनंद नाही. उलट, अशा प्रकारच्या गुन्ह्यात आपल्याला गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, याचे दु:ख आहे. यामागे कोण शकुनी मामा आहे, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली.

आव्हाड म्हणाले की, आपण या गुन्ह्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज करणार नव्हतो. परंतु कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा अर्ज केला. संपूर्ण व्हिडीओमध्ये  ती भगिनी समोरून चालत येताना दिसते.  तिच्या मनात हे सगळे ठरलेले असावे. कारण मी तिला बाजूला केले नसते तर ती आपल्या अंगावरच पडली असती. नंतर एक मोठा गुन्हा आपल्यावर दाखल झाला असता. पण मी तिला बाजूला केले.  मला अडकविण्यासाठी हे सगळे रचले होते. पण देवानेच मला वाचवल्याची भावना आव्हाड यांनी व्यक्त  केली.

आपल्यावर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्यातून तडीपार करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले. 

राजीनाम्यावर निर्णय नाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावरच राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेऊ. कारण आपल्याशी  बोलल्याशिवाय काही पाऊल उचलायचे नाही, असा वडीलकीचा सल्ला पवार यांनी दिल्याचेही ते म्हणाले. हिंदू-मुस्लीम वाद घडवायचा हाेतामुंब्र्यात १३ वर्षे कधी तणाव निर्माण झाला नव्हता. या निमिताने हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद घडवण्याचा प्रयत्न केला. त्याला जबाबदार एक व्यक्ती आहे. ती घरात बसली असून संबंधित महिला बाहेर आहे. मुंब्र्यातील पुलाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीच्या नगरसेविकेलाही  धक्काबुक्की झाली. त्याच्यावर  कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस