शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ketaki Chitale: केतकी चितळेचा बोलविता धनी कोण? पोलिसांकडून शोध सुरु; घरातून लॅपटॉपसह मोबाइल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 08:13 IST

केतकी चितळेने केलेला गुन्हा एकच आहे. मात्र, तरीही तिच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क   ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यावर फेसबुकवर हीन दर्जाची आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्या कळंबोलीतील घरातून ठाणे पोलिसांनी एक लॅपटॉप आणि एक मोबाइल सोमवारी हस्तगत केला. तिने अशी पोस्ट करण्यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

केतकी हिच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कळंबोली पोलिसांनी तिला १४ मे रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला त्याच दिवशी अटक केली. त्याचवेळी तिच्या ताब्यातून एक मोबाइल पोलिसांनी जप्त केला. सध्या तिला १८ मेपर्यंत ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

गुन्हा एकच तरी अनेक ठिकाणी दाखल

केतकीने केलेला गुन्हा एकच आहे. मात्र, तरीही तिच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील गोरेगाव, ठाण्यातील कळवा यासह पुणे, धुळे, नंदुरबार, पारनेर, कुडाळ, उस्मानाबाद अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मुळात, एकच गुन्हा असल्यामुळे तो एकाच ठिकाणी वर्ग करून तपास होणे अपेक्षित असल्याचे मत एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.

कळंबोलीतील तिच्या घरी ठाणे पोलिसांनी पंच तसेच केतकीच्या उपस्थितीमध्ये आणखी एक मोबाइल आणि लॅपटॉप हस्तगत केला. फेसबुकवरील पोस्ट ही मोबाइलवरून केल्याचा तिचा दावा आहे. याची पडताळणी करण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सायबरसह चार पथके : याच्या तपासासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची तीन पथके तसेच सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे एक अशी चार पथके कार्यरत आहेत. सायबरमार्फत तांत्रिक विश्लेषण करून नेमका कोणत्या मोबाइल किंवा लॅपटॉपचा यासाठी वापर झाला, याचा तपास केला जात आहे. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेPoliceपोलिस