शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

केडीएमसीतील शिक्षण समितीवर कोणाला संधी? आज महासभा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:33 AM

केडीएमसीतील शिक्षण समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने गुरुवारी विशेष महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

कल्याण : केडीएमसीतील शिक्षण समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने गुरुवारी विशेष महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. समितीचे सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे त्याआधी या समितीवर वर्णी लावून घेण्यात सेनेतील कोणते नगरसेवक यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१९ मार्च २०१८ ला शिक्षण समितीचे नवीन सदस्य नियुक्त करण्यात आले होते. तर १३ एप्रिलला सभापतीपदाची निवडणूक झाली होती. परंतु, यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदस्यांची नियुक्ती आणि सभापतीपदाची निवड या प्रक्रिया पूर्णत: रखडल्या होत्या. राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार आता गुरुवारी शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी दुपारी २ वाजता केडीएमसीने विशेष महासभा बोलावली आहे.शिक्षण समितीमध्ये ११ सदस्य असून पक्षीय बलाबलानुसार शिवसेना ५, भाजप ४, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी १ अशी स्थिती आहे. मागील वर्षी शिक्षण समितीचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला गेले होते. आता शिवसेनेची टर्म असल्याने समितीवर वर्णी लावून घेण्यात आणि सभापतीपद पटकाविण्यात कोण यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अगोदर शिक्षण मंडळावर सदस्य नेमताना नगरसेवकांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिले जात असत. परंतु, आता तौलनिक संख्याबळाच्या आधारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या माध्यमातून महापालिकेतील नगरसेवकांचीच या ११ सदस्यांच्या समितीवर वर्णी लावली जात आहे.शिक्षण मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळत असत. परंतु, शिक्षण समितीला एक वर्षाचाच कालावधी ठरविण्यात आला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका