शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

कुजबुज शनिवारचे सदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

.............. वरळी आमची लाडोबा मागील विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे हे वरळीतून लढले व जिंकले. पाठोपाठ राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास ...

..............

वरळी आमची लाडोबा

मागील विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे हे वरळीतून लढले व जिंकले. पाठोपाठ राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारमध्ये आदित्य ठाकरे हे केवळ मंत्री असले, तरी अलिखित उपमुख्यमंत्रीच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून एखादा निर्णय मंजूर करवून घ्यायचा असेल, तर आदित्य यांना ब्रिफिंग द्यावे लागते, अशी चर्चा आहे. मूळ मुद्दा हा की, वरळीकरांनी (सचिन अहिर यांच्यासह) आदित्य यांना निवडून दिल्याने आदित्य हे वरळीबाबत वरचेवर बैठका घेतात. नवी आधुनिक रंगीबेरंगी सिग्नल यंत्रणा वरळीत बसली. रस्त्यांच्या फरशांपासून सार्वजनिक स्वच्छतागृहांपर्यंत जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते वरळीकरांना लाभत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत असल्याने मुंबईकरांना जी स्वप्नं दाखवायची आहेत, ती वरळीकरांच्या दारात प्रथम उभी असतात. त्यामुळे मुंबईतील दादरकर, अंधेरीकर, बोरिवलीकर, घाटकोपरकर, वगैरे वरळीत फ्लॅट खरेदी करावा की काय, या विचारात आहेत. ज्यांना हे शक्य नाही, ते आदित्य हे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत की वरळीचे, असा कुत्सित स्वर लावत आहेत. पण, आदित्य यांनी वरळीचे लाड पुरवणे थांबवलेले नाही आणि थांबणार नाही.

.............

बार बार ये दिन आए

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य ठाणेकर दुपारी चार वाजण्याच्या आत दूधदुभते घरात आणून रात्री आठनंतर खिडक्या-दारे बंद करून अन् दहा वाजता मराठी मालिका पाहून झोपी जात असताना त्याच ठाण्यात रात्री दहानंतर (म्हणजे कोरोना कर्फ्यू लागू झाल्यावर) छमछमचा जोश चढत होता. आंबटशौकीन (सी व्हिटॅमिनची कमतरता जाणवल्याने) अंधारात डान्स बारमध्ये जात व मास्कबिस्क भिरकावून देत बेधुंद होऊन पहाटे चार वाजता बाहेर पडत. याचे बिंग फुटले आणि दोन वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर, उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी व दोन कर्मचारी निलंबित झाले. काहींना बदलीचे काळे पाणी दाखवले गेले. या डान्स बारने अनधिकृत बांधकामे केली होती. त्यामुळे महापालिकेनेही बदल्यांचा बडगा उगारला. आतापर्यंत डान्स बार सुरू राहिला, तर किरकोळ कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या. प्रथमच ठाण्यात ही कारवाई झाल्याने मिसळच्या झणझणीत तर्रीवर ताव मारताना या झणझणीत कारवाईबाबत `बार बार ये दिन आए`, असे सामान्य ठाणेकर म्हणत आहेत.

..........

वाचली