शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोणते खेकडे छोटे, कोणते मोठे, हे चौकशीनंतरच समजेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 6:08 AM

मेधा पाटकर : राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप

ठाणे : कोकणातील तिवरे धरण फुटून गावातील २३ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. कोणते छोटे खेकडे आणि कोणते मोठे खेकडे, हे या चौकशीअंती कळेल. तिवरे धरण चिपळूणमध्ये असताना त्याचे ‘मॉनिटरिंग’ दापोलीमध्ये केले जात असून, महाराष्ट्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

श्रमिक जनता संघ आणि इतर असंघटित कामगारांच्या संघटनांचा मेळावा रविवारी ठाण्यात घेण्यात आला होता. या मेळाव्यात कामगार नेत्या मेधा पाटकर यांच्यासह जगदीश खैरालिया, संजीव साने व इतर कामगारवर्ग उपस्थित होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीत जनता १५ लाखाला विसरली असेल, पण हीच जनता कधीकधी सत्तेला आव्हान देते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. देशात चार नवीन कोड तयार होत आहेत. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले जवळपास २३ कायदे बदलले त्यामुळे जातील. जे कायदेशीर निर्णय झालेले आहेत, ते कामगारांना मिळालेच पाहिजे. समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे. यासाठी श्रमिक जनता संघ प्रामाणिकपणे संघर्ष करत आहे. देशात खाजगीकरणाचे वारे वेगात वाहत आहेत. पण रोजगार वाढत नाही. कामगार व शेतकरीदोन्ही संकटात आहेत. सार्वजनिक व्यवस्थेचे कंपनीकरण होत असून, त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. सर्व भांडवलदार संघटित आहेत. त्यांचा नफा रोज वाढतो आहे. पण कामगारांचे उत्पन्न वाढत नाही. उलट त्याची सुरक्षा कमी होत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

‘कामगार मृत्यूप्रकरणीखुनाचा गुन्हा दाखल करा’काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भिंत पडून तब्बल १६ कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नसून बड्या बिल्डरांच्या बाजूने सर्व उभे असतात. श्रमिकांची सुरक्षा कुठे गांभीर्याने घेतली जात नसल्याचे यावेळी पाटकर यांनी सांगितले. भ्रष्टाचारी बिल्डरवर गुन्हे दाखल केलेच पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत, असे मत पाटकर यांनी व्यक्त केले.ठाणे, कल्याण, मुंबई परिसरातील कंत्राटी, असुरक्षित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार, श्रमिकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी, श्रमिक जनता संघाच्यावतीने युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत ठाण्यातील टाउन हॉल येथे कामगार आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. घंटागाडी कामगार, रस्तेसफाईसाठी महापालिकेने ठेवलेले कंत्राटी कामगार, पाणी खात्यातील कंत्राटी कामगार आदी विविध क्षेत्रांतील कामगार आणि कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजर होते.