शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिलेली आश्वासने पूर्ण झाली की नाही, भाजप आमदारानेच काढले पत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 06:04 IST

कथोरे यांचे पत्रक : थेट संपर्क साधण्याचे आवाहन

बदलापूर : निवडणुका आल्या की,वारेमाप आश्वासने द्यायची आणि निवडणुका संपल्या की,मतदारसंघाकडे पाठ फिरवायची, अशीच परिस्थिती बहुतेक ठिकाणी दिसून येते. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी ‘आपला लोकप्रतिनिधी दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असेही फलक लावले जातात. मात्र, आमदार किसन कथोरे यांनी एक पत्रक काढून थेट नागरिकांनाच आवाहन केले आहे की, आपल्या मतदारसंघात जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झालेली नसतील, तर त्यासंदर्भात थेट कार्यालयाशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांचे हे आवाहन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणूक लढवताना आश्वासनांची खैरात करायची आणि विजय निश्चित करण्याचा प्रयत्न करायचा, हा अलिखित नियम राजकारणात पाळला जातो. मात्र, निवडणुका झाल्यावर ती आश्वासने पाळली गेली की नाही, याची विचारणा कोणी करत नाही किंवा त्यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधीही काही चर्चा करत नाहीत.

राजकारणात आश्वासने पाळली जातात असे नाही. त्यामुळे नागरिकही या आश्वासनांची पूर्तत: व्हावी, अशी खास अपेक्षाही धरत नाही. राजकारणावरील विश्वास उडत असताना आमदार कथोरे यांनी मतदारसंघात एक वेगळेच अभियान सुरू केले आहे.२०१४ च्या निवडणुकीत कथोरे यांनी जी आश्वासने दिली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी आश्वासने दिली, त्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे की नाही, याची चाचपणी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. जी आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, त्यासंदर्भात माझ्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत जीजी आश्वासने आपण दिली होती, तीती आश्वासने आपण पूर्ण केलेली आहेत. मात्र, तरीही मतदारांना काही वेगळी आश्वासने दिली असतील, तर त्यांनी त्यासंदर्भात लेखी अथवा स्वत: संपर्क साधून ते काम सुचवावे, असे आवाहन केले आहे. कथोरे यांनी पत्रके सर्व सोसायट्या, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात वाटलेली आहेत. त्यामुळे त्यांचे हे आवाहनपत्रक चांगलेच चर्चेत राहिले आहे.राजकारणात भलतेच धाडस दाखविलेकेवळ नागरिकांनाच हे पत्रक देण्यात आले नसून शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनाही तशाच प्रकारचे आवाहन केले आहे. आमदार कथोरे यांनी असे पत्रक काढून केलेले राजकीय धाडस हे भलतेच चर्चेत राहिले आहे.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारElectionनिवडणूक