शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

50 कुठं आणि 105 कुठं? कल्याणनंतर भाजपाने उल्हासनगरातून शिंदेंना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:06 IST

कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.

महाविकास आघाडीतील जागा वाटपावरील वाद-प्रतिवाद संपल्याचे दिसत नाहीत तोच आता शिंदे गट आणि भाजपात लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपावरून कलगीतुला रंगला आहे. त्यातच फडणवीसांपेक्षा शिंदेंची लोकप्रियता अधिकच्या जाहिरातीने त्यात तेल ओतण्याचे काम केले आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांना 'पायरी' दाखविण्यास उतावळे झाले आहेत. 

कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. आता तो मतदारसंघ शिंदे कुटुंबाचा असल्याने राज्यभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे सुरु होते. त्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीने हे अंतर फारच वाढले होते.

कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीसांनी अचानक कानाचे कारण देत अनुपस्थिती लावल्याने या नाराजीला उधाण आले होते. त्यातच दुसऱ्या दिवशी बावनकुळेंनी जाहिरातीवरून धुसफुस झाल्याचे मान्य केले. यानंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीय. शिंदे गटाच्या एका नेत्याने आमचे ५० आले म्हणूनच सरकार भाजप सरकारमध्ये आले असे वक्तव्य केले आहे. यावरून उल्हासनगरात आता रातोरात बॅनर लागला आहे. 

 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है! असे लिहिलेला बॅनर उल्हासनगरात लावण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोटोखाली  किंगमेकर  असे लिहिण्यात आले आहे. यावरून शिंदेंना त्यांच्याच मतदारसंघात डिवचण्याची भाजपा नेत्यांनी रणनिती दिसत आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा