शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

स्कायवॉकवरील बाजार उठणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:42 IST

रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना आता पूर्वेतील स्कायवॉकवरही बिनदिक्कतपणे त्यांनी ठाण मांडले आहे.

डोंबिवली : रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना आता पूर्वेतील स्कायवॉकवरही बिनदिक्कतपणे त्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात येजा करणाऱ्या प्रवाशांना स्कायवॉकवर चालणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळी गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरी होऊन एल्फिन्स्टनची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.सध्या कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांच्या आदेशानुसार स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर जोमाने कारवाई सुरू असल्याचे चित्र रंगवले जात आहे. कारवाईसाठी पथक आले असतानाही त्याच परिसरात दाबेली, पाणीपुरी आणि मंच्युरियनविक्रेते खुलेआम व्यवसाय करत असल्याचे गुरुवारी सायंकाळी पाहावयास मिळाले. त्यामुळे कारवाई कशी सुरू आहे, याचा अनुभव स्वत: महापौरांनी घ्यावा, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.रेल्वेस्थानक परिसरातील गल्लीबोळ फेरीवाल्यांनी बळकावलेले असताना आता स्थानकाच्या पुलाला जोडणाºया स्कायवॉकवरही बिनधास्तपणे फेरीवाल्यांचा बाजार भरू लागला आहे. प्रारंभी रात्री उशिरा हा बाजार भरत असे. पण, आता दिवसाढवळ्याही तेथे अतिक्रमण होऊ लागले आहे. दोन्ही बाजूला फेरीवाले, भाजीपालाविक्रेते आणि वडापावविक्रेत्यांचा धंदा जोमात सुरू आहे. प्रवासी मोठ्या संख्येने या स्कायवॉकचा वापर करतात. सायंकाळी, रात्रीच्या वेळी कामावरून परतणाºया चाकरमान्यांची स्कायवॉकवर प्रचंड गर्दी होते. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे त्यांना पुलावरून वाट काढणेही कठीण होते.रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला असताना एकूणच हे चित्र पाहता एक प्रकारे उच्च न्यायालयाचाही अवमान होत आहे. पण, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.भिकाऱ्यांचा वावरफेरीवाल्यांबरोबरच डोंबिवलीतील स्कायवॉकवर भिकाºयांचा वावर वाढला आहे. पूर्वेकडील भागात हे बकालतेचे चित्र पाहावयास मिळते. डोंबिवली पश्चिमेतील जोंधळे विद्यालयाकडे उतरणाºया पुलावरही भिकारी असतात, तर मच्छी मार्केट परिसरात उतरणाºया पुलावर शेड नसल्याने तेथे मात्र फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत नाही. रेल्वेच्या पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. केडीएमसीने त्यांच्याकडून आदर्श घ्यावा, अशीही चर्चा सुरू आहे.उद्धव यांच्या आदेशाला तिलांजलीस्कायवॉकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्कायवॉकवर फेरीवाले बसणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. मात्र, स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशालाही तिलांजली दिल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेdombivaliडोंबिवली