शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जीएसटीचा दिलासा, तर नोटाबंदीचा जाच, व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 05:25 IST

चार व्यापारी, चार प्रश्न : कोणत्या मुद्द्यांवर भर, कोणता निर्णय ठरतो भारी, वाढलाय का कर?

व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?प्रश्न । सध्याच्या वातावरणात व्यवसाय, व्यापार करणे सोपे आहे की अवघड? का?

सध्या व्यापार करणे सोपे नाही. आधी जे काम सरळ व्हायचे, ते आता किचकट झाले आहे. कॅशलेस व्यवहारांमुळे व्यवहार मंदावले असून ते पूर्ण होण्यास दोन-तीन दिवस वाट बघावी लागते.चिन्मय कुलकर्णी,हॉटेल व्यावसायिकसध्याच्या वातावरणात व्यापाऱ्यांचे कंबरडे साफ मोडले आहे. आर्थिक मंदीमुळे प्रचंड तणाव आहे. त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे.प्रफुल्ल वाघाडकर,सराफ व्यापारीशहाण्याने व्यापार करू नये. सगळे व्यवहार व्हाइट झाल्याने मुख्य समस्या उद्भवली आहे. खेळते भागभांडवल उरले नाही. त्यामुळे सहज होणारी खरेदीविक्रीठप्प झाल्याचे चित्र आहे.अमित पिंगळे,कापड व्यावसायिकव्यवसाय करणे प्रचंड क्लिष्ट झाले आहे. नियमावलीची हळूहळू अंमलबजावणी हवी. त्यामुळे बाजारात मंदी आहे. व्यवहारांची कागदपत्रे, अटींची पूर्तता करतानाच वेळ जातो.संजय पाटील,बांधकाम व्यावसायिक

प्रश्न । नोटाबंदीनंतर फटका बसला होता का? त्याचा मत देण्यावर परिणाम होईल काय?

नोटाबंदीचा फटका बसला होता. पण, त्याचा परिणाम थेट मतदानावर होईल, असे काही वाटत नाही. सगळे व्यवसाय पारदर्शी झाल्याने उत्पन्नकर वेळेत भरावा लागत असून हा सकारात्मक भाग आहे.नोटाबंदीचा फटका निश्चितच बसला. काम करणाºया नोकरदारांसह छोटे व्यावसायिक, कारागिरांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. सराफ व्यवसायाला मोठा फटका बसला.नोटाबंदीनंतरच तर खºया अर्थाने व्यापार-उद्योगाला फटका बसला. चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला वेळ लागतो. ६० वर्षांमध्ये जे झाले नाही, ते पाच वर्षांत कसे होणार? थोडा वेळ तर जाणारच.नोटाबंदीनंतर बाजारात खेळणारा पैसा कमी झाला. त्यात धंदे कमी झाले. नोकरीची हमी, सुरक्षा नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायात गुंतवणूक होणे गरजेचे होते, ते झालेले नाही.

प्रश्न । जीएसटीमुळे व्यवसायात सुसूत्रता आली का? की करांची कटकट वाढली आहे?

वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) व्यवसायात सुसूत्रता आली. आधी करांमुळे खूप गोंधळ उडत होता. जीएसटीमुळे ती कटकट राहिलेली नाही. सगळ्यांसाठी एकच कर लागू झाला आहे.जीएसटीमुळे सुसूत्रता आली. करांची कटकट कमी झालेली आहे. कारण, एकाच ठिकाणी सगळे कर आलेत. त्यामुळे करभरणा प्रक्रियेत गतिमानता आली आहे.जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात सुसूत्रता आली. व्यवहार चांगले, पारदर्शी होतात. पण, जो व्यापारी असतो, त्याचा कर वाढतो. कॅशलेस व्यवहार होत असल्याने कराचा भार जाणवत आहे.जीएसटीमुळे नियमितता आली आहे, हे नक्की. नव्या व्यवस्थेला काही काळ लागतो. जीएसटी हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. ही करप्रणाली व्यवसायासाठी पूरक ठरत आहे.

प्रश्न । निवडून येणाºया सरकार आणि स्थानिक खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय?

निवडून येणाºया सरकारने युवकांना व्यवसायासाठी संधी द्याव्यात. तसेच डोंबिवलीसंदर्भात या ठिकाणची प्रवेशद्वारे मोठी करावीत. रस्ते रुंद करावेत. त्यामुळे या ठिकाणी आलेली वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.नव्या सरकारने मध्यमवर्गीयांचा व उच्चमध्यमवर्गीयांचा प्रामुख्याने विचार करावा. त्यांना सुरक्षा हवी आहे, ती देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या खिशावर डोळा ठेवून स्वप्न रचू नयेत.रस्ते चांगले असावेत. वाहतूककोंडी नसावी. पावसाळ्यात खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे अशी स्थिती होते. त्यावर कायमचा तोडगा काढावा. तसेच सरकारी योजनांची सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी.भ्रष्टाचार कमी व्हायलाच हवा. ७/१२ काढण्यापासून सगळ्याच बाबींना प्रचंड पैसा द्यावा लागत आहे. व्यवसाय, उद्योग वाढायला हवेत. त्या अडचणी कमी व्हाव्यात, असे वाटते.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक