शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:04 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

ठाणे : कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. त्याची अंमलबजावणी गुरूवारी सुरू झाली. त्याचा फटका सहामाही परीक्षांना बसला असून विद्यार्थ्यांना व-हांड्यात बसवण्याची वेळ आली आहे. रूग्णालये, बँका, एटीएम यांनाही त्याचे चटके बसू लागले आहेत. वीजपुरवठा बंद असल्याने अनेक भागातील नेटवर्क डाऊन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात ‘हर घर मे बिजली’ची घोषणा केली होती. ती विरते न विरते तोच वीज उत्पादन घटल्याने नागरिकांना भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसल्याने विजेची मागणी वाढली आहे. पण भारनियमनामुळे नागरिक त्रासून गेले आहेत. जोवर उत्पादन पूर्ववत होत नाही, तोवर भारनियमन सुरू राहील, असे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.लघुउद्योगांना फटका : या भारनियमनाच्या झळा लघू उद्योगांना बसल्या आहेत. दिवाळीचा फराळ तयार करणारे बचत गही हवालदिल झाले आहेत. शिवाय दुकानांनाही त्याचा फटका बसला आहे. रुग्णांसह नातेवाइकांचे हालठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. तेथील जनरेटरचा उपयोग महत्त्वाच्या विभागासाठी होत असून इतर विभागात वीज नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू झाले आहेत. रुग्णालयातील विविध विभागात भरदुपारी अंधार पसरल्याचे पाहायला मिळते आहे. डोंबिवलीकरांत रोष : डोंबिवली शहरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी कमीत कमी दीड तास ते चार तास असे दोन टप्प्यातील भारनियमन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होतो आहे. सकाळच्या वेळेतील भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे केली. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन देऊन भारनियमनाचा निषेध केला. डोंबिवलीत १०० टक्केवीजबिलाची वसुली होत असून, चोरीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने भारनियमन रद्द करावे. ते शक्य नसेल तर सकाळची वेळ बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.अंबरनाथ, बदलापूरला चटकेअंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथमध्ये चार ते पाच तासांचे भारनियमन लागू झाले आहे. त्याचा फटका नागरी पट्ट्यासह उद्योगांना, शेतीला बसला आहे. बदलापूरमध्ये दोन टप्प्यांत साडेतीन ते चार तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.भिवंडीत यंत्रमागाला फटकाभिवंडी : भिवंडीत आठ तासांचे भारनियमन जाहीर झाले. ते दोन टप्प्यात लागू होईल, असे ठरले होते. मात्र सलग सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहतो आहे. त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला, रूग्णालयांना बसला आहे.भार्इंदरचा काजूपाडा घामाघूममीरा रोड : मीरा रोड-भार्इंदरला रिलायन्स, टाटाचा वीजपुरवठा होत असल्याने शहरात भारनियमन नाही. पण घोडबंदर रोडवरील काजूपाडा, चेणा गावात दोन टप्प्यात सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. तेथे एरव्हीही एक ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो.सहा तासउल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये सहा तास भारनियमन सुरू झाल्याने व्यापाºयांसह नागरिकांनी संताप केला. बिलाची वसुली जादा-चोरी कमी तेथे साडेतीन तास, तर जेथे चोरी जास्त व वसुली कमी आहे तेथे सहा तास भारनियमन आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा