शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर 'आम्ही सारे छंदानंदी ', वाचनप्रेमींची भरली मैफिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:37 PM

वाचनप्रेमी छंदानंदींची मेहफिल वाचक कट्टा ४२ वर भरली आणि अनेक कथा उलगडल्या.

ठळक मुद्देवाचक कट्ट्यावर 'आम्ही सारे छंदानंदी 'वाचनप्रेमींची भरली मैफिलअनेक रंजक कथा आणि कवितांचा  नजराणा सादर

ठाणे : मनुष्याच्या जगण्याचा खरा आनंद मिळवण्याचा एकमेव स्रोत म्हणजे  छंद कारण छंद  जोपासनातना मनुष्य स्वतःला आवडणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींनी सजलेलं स्वतःच विश्व उभं करत कुणी रंगात रंगतो कुणी सुरांमध्ये रमतो कुणी खेळांमध्ये बेभान होतो आणि कुणी शब्दांच्या  संगतीने आयुष्याचा वेगवेगळे अर्थ शोधतो.अशा वाचनप्रेमी छंदानंदींची मैफिल वाचक कट्टा ४२ वर भरली आणि  अनेक रंजक कथा आणि कवितांचा  नजराणा वाचक कट्ट्यावरील श्रोत्यांसमोर सादर झाला. 

                  वाचक कट्टा ४२ ची सुरुवात डॉ.संध्या जोशी,गीता मानवतकर ,नयना खानोलकर ह्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. आयुष्यातील एका विशेष टप्प्यावर  असलेल्या काही ज्येष्ठ वाचकप्रेमींनी एकत्र येऊन  सुरु केलेला अभिवाचन रुपी कार्यक्रम म्हणजे 'आम्ही सारे छंदानंदी'. आयुष्याचा आनंद एकत्र येऊन शेयरिंग आणि केयरिंग पद्धतीने अनुभवणाऱ्या ह्या मंडळींनी त्यांच्या वाचनात आलेल्या काही कथा कवितांचे सादरीकरण वाचक कट्ट्यावर केले.सुप्रिया पाठक ह्यांनी 'कैकयी ची कैफियत', आशा रानडे ह्यांनी 'महाभारतातील एक वाचाळ  मस्तक',विदुला अरुर ह्यांनी  वैविध्य मांडणार ' जीवनातील अनेक गाठींशी सामना', सुधा डोळे  ह्यांनी  'दानशूरपणा' ह्या  अभिवाचन केले. बाळकृष्ण देशपांडे ह्यांनी 'ज्येष्ठांचे मनोगत' ह्यातून  सध्याच्या ज्येष्ठांच्या  भावविश्वाचे अभिवाचन  केले. आशा घोलप ह्यांनी 'आजकाल बोकाळलेली अंधश्रद्धा'  ह्या लेखाचे अभिवाचन केले.कुमुद पाटील ह्यांनी गीता आचरणात आणावी तर सुक्षम जीवन ह्या लेखाचे अभिवाचन केले. श्रीकांत होटे ह्यांनी साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या आठवणी अभिवाचनातून सादर केल्या. गजानन जोशी ह्यांनी गो.वि. करंदीकरांच्या 'न केलेले गुन्हे' ह्या लेखाचे अभिवाचन केले.आयुष्यात काही गोष्टी मनात राहून जातात आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ह्या मनातच घडतात त्याचे शाब्दिक चित्रण गजानन जोशी ह्यांनी अभिवाचनातून सुंदर सादर केले. न्यूतन लंके हिने शिरीष काणेकर लिखित 'स्वतः' आणि कुंदन भोसले ह्याने किरण पावसे लिखित 'एक क्रीमरोल' ह्या लेखांचे सादरीकरण केले. माधुरी गद्रे ह्यांनी पु.ल.देशपांडेंच्या काही आठवणी अभिवाचनातून श्रोत्यांसमोर मांडल्या तर तृप्ती भागात ह्यांनी स्वरचित 'मी कोण आहे ','प्रतिभाशाक्ती' ,'आई' ,'आर्ट फिल्म् ' ह्या कवितांचे अभिवाचन केले.  

            कार्यक्रमाच्या शेवटी अभिनय कट्ट्याचा कलाकार धनेश चव्हाण ह्याने विपुल महापुरुष लिखित 'लालटेन' एकांकिकेतील एक प्रसंग सादर केला . सादर वाचक कट्ट्यावर सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'आम्ही सारे छंदानंदी' च्या सर्व सभासदांनी वाचक कट्ट्याचे आभार मानले. मराठी भाषेचं अस्तित्व अस्मिता कुठेतरी  हरवत चाललीय त्याचे संवर्धन करण्यासाठी वाचक कट्ट्याची स्थापना करण्यात आली. आज 'आम्ही सारे छंदानंदी' ह्या ज्येष्ठ वाचकांनी सादर केलेलं अभिवाचन येणाऱ्या तरुण वाचकांसाठी  प्रेरणादायक ठरेल.वाचनसंस्कृती टिकवून ठेवणाऱ्या 'आम्ही सारे छंदानंदी' ह्या चमूचे खरंच कौतुक करण्यासारखे  आहे .ह्या वयातही त्यांनी जोपसलेले छंद आणि त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाने आयुष्यात जोपासला पाहिजे तरच आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला उलगडेल.असे मत वाचक कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.वाचक कट्ट्यावर आपणही अभिवाचन सादर करू शकता.कारण वाचन हा असा छंद आहे जो स्वतःसोबत दुसऱ्यालाही आनंद देतो.त्यामुळे वाचक कट्ट्यावर प्रत्येकाने अभिवाचन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई