ऐन उन्हाळ््यात कीडे मिश्रीत पाणीपुरवठा
By Admin | Updated: April 19, 2017 00:21 IST2017-04-19T00:21:14+5:302017-04-19T00:21:14+5:30
पश्चिमेतील चिखलेबाग प्रभागातील आसमान बिल्डींगमधील पिण्याच्या पाण्यात मंगळवारी ऐन उन्हाळ््यात गांडूळ व अन्य कीडे आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

ऐन उन्हाळ््यात कीडे मिश्रीत पाणीपुरवठा
कल्याण : पश्चिमेतील चिखलेबाग प्रभागातील आसमान बिल्डींगमधील पिण्याच्या पाण्यात मंगळवारी ऐन उन्हाळ््यात गांडूळ व अन्य कीडे आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
केडीएमसी प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन रहिवाशांच्या जीवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवावा आणि जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरावे, या उद्देशाने केडीएमसीने पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे मंगळवारी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा बंद असतो, तर एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या २७ गावांचा पाणीपुरवठा हा शुक्रवारी बंद असतो.
एकीकडे पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणी बचतीचे धडे केडीएमसीकडून दिले जात असताना दुसरीकडे मात्र होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. हे वास्तव रामबाग जैन सोसायटी परिसरातील आसमान बिल्डींगमध्ये पहावयास मिळत आहे.
आसमान इमारतीत ४० कुटुंबे राहतात. या बिल्डींगमधील बहुतांश घरांमध्ये पिण्याच्या पाण्यातून कीडे, गांडूळ आल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यासंदर्भात रहिवाशांनी केडीएमसीचा पाणीपुरवठा विभाग आणि महापौर राजेंद्र
देवळेकर यांच्याकडेही तक्रार केली आहे, अशी माहिती रहिवासी व शिवनिष्ठ सेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष आकाश शितकर यांनी दिली. (प्रतिनिधी)