भार्इंदरच्या महासभेत पाणीबाणी गाजली
By Admin | Updated: March 20, 2016 00:50 IST2016-03-20T00:50:30+5:302016-03-20T00:50:30+5:30
पानी दो, पानी दो अशी मागणी, सरकारच्या अच्छे दिनची उडवलेली खिल्ली, खुर्च्या रिकाम्या करण्याच्या घोषणा आणि निषेधाचे फडकावलेले फलक यामुळे शनिवारची मीरा-भार्इंदरची

भार्इंदरच्या महासभेत पाणीबाणी गाजली
भार्इंदर : पानी दो, पानी दो अशी मागणी, सरकारच्या अच्छे दिनची उडवलेली खिल्ली, खुर्च्या रिकाम्या करण्याच्या घोषणा आणि निषेधाचे फडकावलेले फलक यामुळे शनिवारची मीरा-भार्इंदरची महासभा गाजली.
पाणी दो, पाणी दो, अशी मागणी करत विरोधकांनी महासभा गाजवून सोडली. आघाडीच्या काळात राज्य सरकारने मीरा-भार्इंदर शहराला पाणीकपात लागू करू नये, असा आदेश काढला होता. युतीच्या राज्यकर्त्यांनी त्याला बगल देत शहराच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी केला.
शहरात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे पाण्याची चोरी होते. ते मोठ्या रकमा वसूल करून सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील टँकर लॉबीला पाणी विकतात, असा आरोप आघाडीच्या सदस्यांनी केला.
भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी आघाडी सरकारने केवळ पाणी दिल्याची बॅनरबाजी केली. पण, प्रत्यक्षात ते पाणी युती सरकारच्या काळात शहराला मंजूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सर्वत्र टंचाई असतानाही युती शासनाने शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर करून दिलासा दिल्याचा दावा पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)
आघाडीच्या सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या देत युतीच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवली. पुरेसे पाणी द्या, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा, अशी मागणी केली आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करणारे फलक झळकावले.