शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात उल्हास नदीतून पाणीचोरी सुरुच, चिखलोली धरणातूनही पाणी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:34 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत.

- पंकज पाटीलअंबरनाथ/बदलापूर - अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. उल्हास नदीतून पाणी चोरी करणाऱ्या टँकरची संख्या दिवसागणिक वाढते आहे. तर चिखलोली धरणाच्या पात्रात जाऊन काही टँकर चालक पाणीचोरी करत आहेत. या दोन्ही पाणी चोरीकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणी पुरवठा होतो. चिखलोली धरणाने तळ गाठल्याने ते पाणी न वापरता त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून पाणी घेतले जात आहे. तरीही या चिखलोली धरणातील पाण्यावर डल्ला मारण्याचे काम काही टँकर मालक करताना दिसत आहेत. चिखलोली धरणाच्या पायथ्याशी वाहून येणारे पाणी एका डबक्यात साठवून ते पाणी काही टँकर चालक उचलत आहेत.तर काही टँकर चालकांनी थेट चिखलोली धरणाच्या पात्रातच टँकर उभे करून दिवसाढवळ्या पाणी चोरी सुरू केली आहे. धरणाच्या पात्रात जाण्यास बंदी असतानाही थेट टँकरच या पात्रात जात आहेत. टँकर मालकांची ही दादागिरी असल्याने त्यांना या ठिकाणी कोणीच रोखत नाहीत. एमआयडीसीमार्गे हे टँकर चालक थेट धरण पात्रात उतरतात. तेथे पंप लावून पाणी उचलण्याचे काम करत आहेत. दिवसाला ६० ते ७० टँकर भरुन शहरात नेले जात आहे. त्या पाण्याची विक्री १००० ते २००० रुपयांपर्यंत केले जात आहे. दररोज टँकर चालक पाण्याची चोरी करत असतानाही त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत.दुसरीकडे उल्हास नदीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या पात्रात बदलापूर गावाजवळील पुलाखाली अनेक टँकर दररोज १०० हुन अधिक टँकर भरुन नेत आहेत. काही भागात पाणी टंचाई असल्याने हे टँकर त्या ठिकाणी पुरविण्यात येत आहेत. एकावेळी १० ते १२ टँकर उल्हास नदीत पाणी भरत असतात. दिवसा हा प्रकार घडत असतांनाही त्यांना रोखण्याचे काम केले जात नाही. गेल्या आठवड्याभरात नदीतुन पाणी भरणाºया टँकरची संख्या वाढल्याने टँकर लॉबी ही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणे शक्य होत नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे लघुबाटबंधारे विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर