शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम? देखभाल दुरुस्तीला स्थगितीचा फटका : डोंबिवलीतील नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:58 IST

केडीएमसीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या २ कोटी २१ लाख रुपये किमतीच्या राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निविदांचा विषय स्थगित ठेवण्यात आला.

कल्याण : केडीएमसीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या २ कोटी २१ लाख रुपये किमतीच्या राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निविदांचा विषय स्थगित ठेवण्यात आला. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामांना आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या कामांना स्थगिती दिल्याने ‘ह’, ‘फ,’ ‘ग’ आणि ‘क’ प्रभागांतील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापैकी ‘ह’, ‘फ’ आणि ‘ग’ हे प्रभाग डोंबिवलीशी निगडीत असल्याने डोंबिवलीतील कामे मागे ठेवल्याचा सूर उमटला आहे.महापालिकेच्या महासभेत आर्थिक कोंडीविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधीपक्ष मनसेने केली होती. त्यावर आयुक्त पी. वेलरासू यांनी खुलासा करत ३०० कोटीची तूट उत्पन्न आणि खर्चात आहे. त्यामुळे नवीन कामे घेता येणार नाहीत. कंत्राटदारांना ६० कोटींची बिले अदा करायची आहेत. त्याचबरोबर बांधील खर्चाला बाधा येणार नाही. त्यात कर्मचारी पगार व बोनस बाधित होणार नाही. त्याचबरोबर देखभाल दुरुस्तीची कामे आर्थिक कोंडीत बाधित होणार नाही. ती केली जातील, असे सांगितले होते. परंतु, मंगळवारच्या स्थायी समितीत राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामाविषयी सभापती रमेश म्हात्रे यांनी संशय व्यक्त केला होता. या संशयापोटीच त्यांनी २ कोटी २१ लाख रुपये खर्चाची देखलभाल दुरुस्तीची कामे मंजूर करण्याऐवजी स्थगित ठेवली. त्यांच्या संशयाला सदस्य विकास म्हात्रे यांनी दुजोरा दिला. ही काम पुढील सभेत मंजूर केली जातील, असे सभापतींकडून सांगण्यात आले असले तरी त्याला विलंब होणार आहे.वास्तविक पाहता जीएसटी लागू झाली आहे. जीएसटी कर हा कंत्राटाराने भरायचा आहे. जीएसटी संदर्भात आयुक्तांकडे बैठक यापूर्वीच झालेली आहे. कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या विकासकामाचा जीएसटीही अधिकचा भरावा लागणार आहे. जीएसटी हे देखील स्थगितीच्या मागचे कारण असू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.महापालिकेकडे व्हॉल्व्हमन, प्लंबर आणि अन्य कामगार नाहीत. त्यामुळे महापालिकेची पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची मदार ही केवळ कंत्राटदारावर आहे. कंत्राट मंजूर करण्यात विलंब झाला तर देखभाल दुरुस्तीअभावी डोंबिवलीत पाणी असूनही, टंचाई उद्भवू शकते, अशी शक्यता नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. महासभेत पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जात नाही असा मुद्दा शिवसेना सदस्य निलेश शिंदे यांनी उपस्थित केला होता.देखभाल दुरुस्ती कामे होत नसल्याने कल्याण पूर्वेत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. देखभाल दुरुस्तीची १५ कोटींची कामे केली जातील. त्याला आर्थिक कोंडीचा अडसर येणार नाही, आयुक्तांनी स्पष्ट केले होते. एकीकडे आयुक्त काम करीत नाहीत, तर दुसरीकडे त्यांनी १५ कोटींची दुरुस्तीची कामे करण्याची तयारी दर्शविली असताना कोणाच्या तरी आकसापोटी व भ्रष्टाचाराच्या संशयापोटी स्थगिती देणे कितपत योग्य आहे, असे डोंबिवलीतील सदस्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका