कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा गुरूवार दुपारपासून २४ तासांसाठी बंद राहणार!

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 20, 2025 15:31 IST2025-05-20T15:31:06+5:302025-05-20T15:31:41+5:30

रुपादेवी पाडा, किसन नगर क्र. २, नेहरू नगर, कोलशेत खालचा गाव येथेही पाणी पुरवठा राहणार बंद

Water supply in Kalwa, Mumbra and Diva areas will be shut off for 24 hours from Thursday afternoon! | कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा गुरूवार दुपारपासून २४ तासांसाठी बंद राहणार!

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा गुरूवार दुपारपासून २४ तासांसाठी बंद राहणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील. परिणामी गुरूवार (२२ मे, २०२५) दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार (२३ मे, २०२५) रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग तसेच, वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर नं २, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहील.

शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Web Title: Water supply in Kalwa, Mumbra and Diva areas will be shut off for 24 hours from Thursday afternoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.