शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पाण्याचा वेढा! गरोदर महिलेला चक्क झोळीतून नेले रुग्णालयात; आदिवासींनी अनुभवला थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 1:11 AM

पहिले बाळंतपण असलेल्या या मातेला रुग्णालय गाठण्यासाठी धड रस्ताही मिळाला नाही. शांघायशी बरोबरी करू पाहणाºया मुंबई, ठाणे परिसरात असलेली ही परिस्थिती सर्वांसाठीच खेदजनक आहे.

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्याने आदिवासी गावपाड्यांना वेढा घातला आहे. अशा बिकट प्रसंगात तळ्याचीवाडी येथील गरोदर महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे महिलेला झोळीत घालून कसेबसे जंगलाच्या वाटेने मुरबाड गाठावे लागले.बारवी धरणाच्या पाणलोटातील गावांना पाण्याने वेढले आहे. मुरबाड तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमधील ही तळ्याचीवाडी आदिवासी लोकवस्तीची आहे. धरणग्रस्तांच्या या वाडीत आदिवासी समाज वास्तव्याला आहे. गरिबीला तोंड देणाºया या गावातील चंद्रकला रघुनाथ झुगरे हिला प्रसूतिकळा सुरू झाल्या असता, रुग्णालयाकडे जाणारे तिन्ही बाजूंचे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी जंगलातून या महिलेला झोळीत टाकून पायवाटेने मुरबाड येथील रुग्णालयापर्यंत पोहोचवले. १७ जुलै रोजी गावकºयांवर हा प्रसंग ओढवला होता.

पहिले बाळंतपण असलेल्या या मातेला रुग्णालय गाठण्यासाठी धड रस्ताही मिळाला नाही. शांघायशी बरोबरी करू पाहणाºया मुंबई, ठाणे परिसरात असलेली ही परिस्थिती सर्वांसाठीच खेदजनक आहे. या जंगलातून वनविभाग रस्ता काढू देत नसल्यामुळे गावपाड्यांच्या रहिवाशांना पाऊलवाटेने, दगड, काट्यांतून महिलेला झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. या झोळीत लाकडाचा दांडा टाकून तो दोन्ही बाजूंनी दोघांनी उचलून महिलेचा मार्ग सुकर केला. दुर्दैव म्हणजे, शस्त्रक्रियेचे टाके काढण्यापासून पुढील उपचारासाठी याच झोळीने महिलेला मुरबाड गाठावे लागत आहे. जंगल, कच्चा रस्ता, दगडधोंडे व चिखलातून तिला हा प्रवास रोज करावा लागत आहे. या भागातील आदिवासींसाठी या समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. डोक्यावरून रेशन, बाजार तीन किमीपर्यंत आणायचे. आजारी व्यक्ती, रात्री-अपरात्री कधीही कुठेही पायी जायचे, आदी समस्यांनी आदिवासी हैराण झाले आहेत.

शासनाच्या योजना फक्त कागदावरचझोळीत घालून महिलेला रुग्णालयात नेले असता, उशीर झाल्याचे सांगून त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसूती झाली. त्यासाठी आलेला ३0 हजार रुपयांचा खर्च या आदिवासींनी एकत्र मिळून केला. अशावेळी शासनाच्या योजना फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येते, असे या परिसरातील समाजसेविका अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलTrible Development Schemeआदिवासी विकास योजना