शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:48 IST

; लोकप्रतिनिधी उदासीन

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्ती मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून तोकडे प्रयत्न होत असल्याने आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजूनही थांबलेली नाही नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, फसलेली जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकरयुक्त गावाची संख्या दरवर्षी कमी होण्या ऐवजी वाढत चालली असून हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने उमेदवार मागतात मते मतदार मागतात पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष असल्याने मोखाडा वासीयांच्या पदरी पाणी टंचाईचे संकट कायम असून पाच मोठी धरणे उशाला असूनही लोकप्रतिनिधी व येथील प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

तसेच गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पासून टंचाईग्रस्त गाव पाड्े २०-२५ किलो मिटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकरची दिवसभर वाट बघावी लागत असून मोलमजूरी करुन पोटाची खळगी भरणाºया आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दरवर्षीच डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वासून एप्रिल- मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो आज घडीला तालुक्यातील ७४ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने गावपाड्यांची तहान भागवली जात आहे दरवर्षी टँकरच्या नावाखाली करोडोचा खर्च केला जात असतांना निवडणुकीच्या काळात टँकर मुक्तीच्या आश्वासनांचा पाऊस पाडणाºया राजकीय पुढाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचा कायमचा विसर पडला असल्याने स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.
लाखाच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा, अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे या धरणावर करोडोंचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणी टंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि मी अंतरावर शासनाने पाणी पोहचवले आहे परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील धरणांचे पाणी मुंबईला नेणाºया सरकारला धरणांच्या जवळपास असलेल्या या तालुक्यातील गावांना का पुरवता येत नाही असा जनतेचा सवाल आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई