दिव्यातील चाळींमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST2021-04-06T04:39:36+5:302021-04-06T04:39:36+5:30

मुंब्राः जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी दोन चाळींच्यामध्ये शिरल्याची घटना दिव्यात सोमवारी घडली. दिव्यातील गणेशनगर परिसरातील गणेश मंदिरासमोर ...

Water seeped into the lampstands | दिव्यातील चाळींमध्ये शिरले पाणी

दिव्यातील चाळींमध्ये शिरले पाणी

मुंब्राः जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी दोन चाळींच्यामध्ये शिरल्याची घटना दिव्यात सोमवारी घडली. दिव्यातील गणेशनगर परिसरातील गणेश मंदिरासमोर गटाराचे काम सुरू आहे. यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली.

या जलवाहिनीमधून सकाळी दहा वाजल्यापासून वाहणारे पाणी काही वेळातच शिवशक्ती चाळीत शिरले. यामुळे संतप्त झालेल्या चाळीतील काही रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन करून याची माहिती दिली. परंतु, त्यांनी वेळीच दाद न दिल्यामुळे चाळीत दोन फूट पाणी जमा झाले होते, अशी माहिती चाळीतील रहिवासी नारायण देशमुख यांनी लोकमतला दिली. दरम्यान दिव्यातील अनेक परिसरात पाण्याचे मोठ्या दुर्भिक्ष जाणवत असतानाचा वाया गेलेल्या पाण्याकडे बघून नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

Web Title: Water seeped into the lampstands