शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमधील शिरगावच्या सोसायट्या टँकरवर अवलंबून, शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:42 IST

बदलापूर शहराला लागून उल्हास नदी असतानाही या शहरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे.

बदलापूर - बदलापूर शहराला लागून उल्हास नदी असतानाही या शहरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे. शिरगांव परिसरात सर्वाधिक पाणीटंचाई असून या भागातील बहुसंख्य गृहसंकुले ही आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सोनिवली गांव परिसरात निर्माण झाली आहे.कुळगांव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील परिसराला जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. बदलापुरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शहरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत घोळ असल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे.शिरगांव परिसरात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिल्याने त्यांना गरजेनुसार पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. या परिसरात हजार ते दीड हजार घरांचे प्रकल्प उभे राहिले आहेत. ज्या प्रमाणात घरांची आणि इमारतींची उभारणी झाली आहे, त्या प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. कमी व्यासाच्या जलवाहिन्यांवर अनेक इमारतींना नळजोडणी दिल्याने प्रत्येक इमारतीला मुबलक पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे काही भागात केवळ अर्धा तास पाणी सोडले जात असल्याने ते संपूर्ण इमारतीला पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक सोसायट्या पिण्यासाठी टँकरचे पाणी वापरत आहेत. ज्या इमारतींना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही अशा इमारतींना टँकरने पाणी देण्याची सोय केली आहे. मात्र, त्याचे योग्य ते दर संबंधित टँकर चालकांना द्यावे लागत आहेत. परिणामी, टँकरच्या महागड्या पाण्याकरिता बदलापूरकरांच्या खिशाला खार लागत आहे.शिरगावातील सॅफ्रॉन हिल्स, गुरू प्रेरणा, लाईफ स्टाईल या गृहसंकुलांना मुबलक पाणी मिळत नसल्याने त्यांना टँकरचे पाणी मागवण्याची वेळ आली आहे. या भागातील अनेक गृह प्रकल्पातील कूपनलिका बंद पडल्याने दररोज लागणारे पाणी टँकरच्याच माध्यमातून उपलब्ध करावे लागते.वाढीव पाणीपुरवठा योजनेतून शिरगांव परिसरात स्वतंत्र जलकुंभ आणि विस्तारीत जलवाहिन्या टाकण्याचे काम या आधीच केलेले आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी पडत असल्याने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. बदलापूर शहराला बारवी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही तोवर शहराच्या सीमेवर असलेल्या भागाला मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे अशक्य आहे. ब्शहरातील बहुसंख्य टँकर हे शिरगांव परिसरातील सोसायटीमध्येच फेऱ्या मारतांना दिसत आहेत. सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाला सुरक्षेपेक्षा टँकरचे पाणी पंपाद्वारे घरांना व्यवस्थित पुरवण्याचे काम करावे लागते.शिरगांव भागात पाणीटंचाई ही काही नवीन नाही. काही भागात पाणी येत असले तरी ते अर्धा तासापेक्षा जास्त मिळत नाही. एवढ्या कमी वेळेत इमारतीमधील घरांना पाणी पुरवणे शक्य नाही. त्यामुळे बाहेरून टँकर मागवण्याची वेळ येते. - अविनाश मोरे, रहिवासी, शिरगांव

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbadlapurबदलापूर