आडिवली-ढाेकळीतील पाणीटंचाई हाेणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:43+5:302021-04-19T04:37:43+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाला अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे. आडिवली-ढोकळीमध्ये ...

आडिवली-ढाेकळीतील पाणीटंचाई हाेणार दूर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाला अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे. आडिवली-ढोकळीमध्ये हे काम अंतिम टप्प्यात आहे. जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी नळजोडणीचे काम सुरू आहे. या कामाचे उद्घाटन शनिवारी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
२७ गावांत अनेक वर्षांपासून असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाकडे पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदींसह अन्य नेत्यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देत लक्ष वेधले हाेते. त्यानंतर काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अमृत योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. आडिवली-ढोकळी परिसरात ही योजना अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या योजनेद्वारे पाणी समस्या दूर होणार आहे. या कामाचे माजी नगरसेवक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी समाजसेवक अनिल पाटील, रूपा पाटील, माजी नगरसेवक गणेश भाने, ज्ञानेश्वर हिवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य नकुल भोईर, माजी सरपंच मुरलीधर राणे, युवा समाजसेवक प्रीतम पाटील, आदी उपस्थित हाेते. यावेळी ग्रामस्थांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले.