पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडित

By अजित मांडके | Published: March 1, 2024 05:30 PM2024-03-01T17:30:04+5:302024-03-01T17:31:43+5:30

१६७ मोटर जप्त, २४ पंप रूम सील.

water payment recovery campaign tap connection of 488 customers who did not pay water bill arrears disconnected in thane | पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडित

पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडित

अजित मांडके ,ठाणे : जल देयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली असून २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या काळात ४८८ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तर, १६७ मोटर जप्त केल्या असून २४ पंप रुम सील करण्यात आली आहेत. दरम्यान, थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारात १०० टक्के सवलत देण्याची योजना ३१ मार्चपर्यंत वाढविण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली आहे. 

ठाणे महापालिकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २२३ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. त्यात, ८८ कोटी रुपयांची थकबाकी असून १३४ कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी, २२ कोटी रुपयांची थकबाकी तर ५९ कोटी रुपये चालू वर्षाची देयके असे एकूण ८१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत सुमारे १४१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी. तसेच, थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडित करावे, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी गेल्या आठवड्यात पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार, प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

प्रभाग समिती               खंडित नळ जोडण्या
नौपाडा-कोपरी  -                   ८४
उथळसर -                             ४९
वागळे -                                 ५४
लोकमान्य - सावरकर नगर -  ३७
वर्तकनगर -                            ०९
माजिवडा-मानपाडा -             ०७
कळवा -                                ४७
दिवा -                                   ७१
मुंब्रा -                                    १३०

एकूण -                                 ४८८

प्रशासकीय आकारात १०० टक्के सूट :  जे घरगुती नळसंयोजन धारक ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत पाणी बील, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील, त्यांना त्या थकित बिलावरील प्रशासकीय आकारातून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना, तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही.

Web Title: water payment recovery campaign tap connection of 488 customers who did not pay water bill arrears disconnected in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.