शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लोढांची लाखमोलाची ‘पलावा’ बुडाली; स्मार्ट सिटीचे धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:48 IST

देसाई खाडीत केलेल्या बांधकामांचा बसला फटका

डोंबिवली : मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी डोंबिवलीजवळ कल्याण-शीळ मार्गावर देसाई खाडी बुजवून उभी केलेली पलावा ही स्मार्ट सिटी गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसात बुडाली. लक्षावधी रुपये खर्च करून येथे आलिशान फ्लॅट घेतलेल्यांची महागडी वाहने पुराच्या पाण्यात होडीसारखी तरंगत होती. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर करून प्रमोशन केलेल्या या प्रकल्पाची अब्रू चव्हाट्यावर आली.पलावा सिटीला लागून असलेली देसाई खाडी ही मलंगगड येथून मुंब्रा खाडीला मिळते. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुराच्या वेळीही पलावा सिटी पाण्याखाली गेली होती. मात्र, त्यावेळी या ठिकाणी फ्लॅटची एवढी मोठी विक्री झाली नव्हती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा देसाई खाडी कोपली आणि पलावा सिटीत पाणी घुसले. पूर नियंत्रणरेषेच्या पलीकडे बांधकामे न करता ती खाडीकिनारी केल्याचा फटका पलावातील रहिवाशांना बसला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पलावा सिटीला भेट देऊन पुरामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांसोबत बातचीत केली असता त्यांनी मात्र केवळ पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. इतरत्र फारसे काहीच नुकसान झाले नाही, असा दावा केला. सोमवारी येथील सोसायटींमधील पाणी पूर्णपणे ओसरले होते. परंतु, रस्त्यांवर मात्र काही प्रमाणात पाणी व चिखल अद्यापही साचल्याचे पाहायला मिळाले.शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहरांची दाणादाण उडवून दिली होती. सर्वाधिक फटका खाडीलगत असलेल्या भागाला बसला. दोन्ही शहरांतील सोसायट्या आणि चाळी तर पाण्याखाली गेल्याच, पण पलावासारखी सिटी आणि मोठी गृहसंकुले यांच्यातही पुराचे पाणी घुसले होते. तळ मजल्यावरील पार्किंगचा परिसर पाण्याखाली गेल्याचे चित्र पलावा सिटीत पाहावयास मिळाले. ‘कासारीओ पलावा’ आणि ‘कासाबेला गोल्ड’ या दोन भागांत पलावा सिटी विभागली आहे. ‘कासाबेला’ला फारसे पाणी भरले नव्हते. परंतु, ‘कासारीओ’ येथील परिसर संपूर्णपणे जलमय झाला होता. तेथील भीषण परिस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.रस्त्यावर अद्याप पाणीच पाणीरविवारी येथील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. सोमवारी याठिकाणचे पाणी ओसरले होते. परिसराची स्वच्छता करण्यात येत असल्याचे दिसून आले. ‘कासारीओ’ या गृहसंकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पुराचे पाणी, चिखल साठल्याचे दिसून आले. येथील चौकांमध्येही पाणी असल्याने दुचाकीस्वारांना पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. स्मार्ट सिटीचे ओंगळवाणे चित्र तेथे पाहायला मिळाले.पलावातील काही परिसर जलमय होण्यास खाडी परिसरात सुरू असलेले पुलाचे बांधकाम जबाबदार आहे. त्यामुळेच सोसायटीमधील तळ मजला पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, पलावा सिटी मॅनेजमेंटचे मोठे सहकार्य रहिवाशांना मिळाले.-ऐश्वर्य कोल्हटकर, रहिवासी, ‘मरिना’ सोसायटी

टॅग्स :Rainपाऊस