शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर
2
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
3
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
4
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
5
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
6
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
7
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
8
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
9
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
10
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
11
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
12
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
13
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
14
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
15
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
16
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
17
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
18
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
19
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 
20
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...

जिल्ह्यातील दाेन दिवसांची पाणीकपात रद्द  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:32 AM

नागरिकांना गारेगार दिलासा : सहा महापालिकांसह दोन नगर परिषदांना मिळणार लाभ  

- सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू केली होती. यामुळे कोरोनाच्या या संकटकाळी जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि अन्य गावपाड्यांना या पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. मात्र, या चैत्र, वैशाखाच्या कडकडीत उन्हाळ्यात ही पाणीकपात थांबवण्याचा निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने गारेगार दिलासा दिला आहे.

‘पाणीकपात रद्दच्या हालचालींना जोर’ या मथळ्याखाली लोकमतने २६ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून गृहिणींना दिलासा दिला होता. त्यानुसार प्रशासनाने निर्णय घेऊन महिन्यातील दोन वेळची २४ तासांची पाणीकपात रद्द केली आहे. पावसाळा अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर आला आहे. याशिवाय जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र, बारवी आदी प्रमुख धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. एवढेच नव्हे तर यंदा प्रारंभापासून दमदार पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत. त्यात कोरोनाचा काळ आणि कडक उन्हाळ्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. घशाला कोरड आणि घामाच्या धारांनी शरीरातील पाणी कमी होण्याचे सध्याचे अनुभव आहेत. परंतु, आता कपात थांबवल्याने नियमित व मुबलक पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या शहरांना त्यांचा मंजूर पाणीपुरवठा आता सुरळीत होईल. या शहरांना त्यांचा रोजचा तीन हजार ६२१ दश लक्ष लीटर (एमएलडी) हा मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे गृहिणींची पाणीसमस्या आता दूर होऊन त्यांना या कडकडीत उन्हाळ्यात पापड, कुरड्या, शेवया आणि वाळवणासाठी व धुणीभांडीकरिता मुबलक पाणी वापरता येणार आहे. यासाठी मात्र स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणेत थातूरमातूर समस्या उद्भवणार असल्याने दक्षता घेणे आवश्यक आहे.

३,६२१ एमएलडी मिळणार पाणी ठाणे : जिल्ह्यातील पाणीकपात थांबवल्याने मुंबईसहजिल्हाभरातील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला त्यांचा तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा मंजूर पाणी कोटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, आंध्रचे पाणी उल्हास नदीद्वारे, मोरबे, पिसे, हेटवणे आदी धरणातून बृहन्मुंबईसह ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या सहा महापालिका, अंबरनाथ, कुळगाव - बदलापूर या दोन नगर परिषदा आणि काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसी, एमजेपी, शहाड स्टेमघर प्राधिकरण आदी संस्थांना जिल्ह्यातील शहरांतील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज ३,६२२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करता येणार आहे. मुंबई  पालिकेला भातसा मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातून पुरवठा होतो. ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा भातसा, शहाड स्टेमघर, एमआयडीसी आणि पिसे धरणातून होतो. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून मिळत आहे.  कल्याण-डोंबिवली मनपाला २६४ एमएलडी, भिवंडीला २१० एमएलडी, मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणी शहाड स्टेमघर व एमआयडीसीद्वारे उल्हास नदीतून मिळते. बदलापूरला ३७, अंबरनाथला ५५ आणि उल्हासनगरला १२० एमएलडी पाणी बारवी धरण व उल्हास नदीतून एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रोज मिळत आहे. एमआयडीला १६० एमएलडी पाणी बारवीतून मिळते.  बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली असल्यामुळे या धरणात आता भरपूर पाणीसाठा आहे.