शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात केवळ १२ तासच हाेणार पाणीकपात; महापालिकेने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:24 IST

नागरिकांना मिळाला मोठा दिलासा

ठाणे : एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणांनी ठाणे जिल्ह्यात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीचा फटका ठाण्याला सर्वाधिक बसणार आहे. कळवा, मुंब्रा भागाला अधिक झळा साेसाव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कपातीच्या काळात स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा विभागवार १२ तास सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा २४ ऐवजी १२ तासच बंद राहणार आहे. त्यानुसार घोडबंदर भागात १२ तास आणि उर्वरित ठाण्यात १२ तास असा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट केले आहे.

एमआयडीसी आणि स्टेमकडून १५ जुलैपर्यंत १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीमुळे महिन्यातून दोनदा २४ तास शहरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठामपाने ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठ्याचे स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी स्टेम प्राधिकरणाकडून, तर शुक्रवारी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या काळात मनपा स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू ठेवणार आहे. मनपाला स्टेमकडून प्रतिदिन ११० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे नियोजन ठाणे शहर, घोडबंदर, कळवा आणि मुंब्य्रातील काही भागांमध्ये करण्यात येते.

असे असेल शटडाउन आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक 

महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार या कालावधीत ठाणे महापालिका स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचे नियोजन टप्प्याटप्प्याने केले आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबिळ आदी ठिकाणचा पाणीपुरवठा हा बुधवारी सकाळी ९ ते बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याच्या काही भागांचा पाणीपुरवठा हा बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी