शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागांत आजपासून अडीच दिवसांची पाणीकपात

By admin | Updated: February 17, 2016 02:04 IST

ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी

कल्याण : ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी ६ अशी अडीच दिवसांची (६० तासांची) पाणीकपात लागू केली जाणार असल्याची माहीती एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी दिली.उपलब्ध असलेल्या पाणीसाठयाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस ठाणे जिल्हयात पाणीबाणी लागू केली होती. परंतु, सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवूनही उर्वरीत दिवशीही कल्याण डोंबिवलीत पाण्याची बोंबाबोंब कायम राहिल्याने ही पाणीकपात रद्द करावी लागली होती. यानंतर पूर्वीचे जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात मंगळवार आणि शनिवार या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल याअनुषंगाने या आठवडयापासून एमआयडीसीने ६० तासांची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बारवीमध्ये ९० आणि आंद्रा धरणात ६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो केवळ १०५ दिवस पुरेल इतकाच असल्याने हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसह ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, मिरा-भार्इंदर आदी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.