अंबरनाथमध्ये पाणीच पाणी
By Admin | Updated: November 4, 2015 00:29 IST2015-11-04T00:29:09+5:302015-11-04T00:29:09+5:30
बॅरेज धरणातून अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी कल्याण-बदलापूर महामार्गावरील अंबरनाथ नगपरिषद कार्यालयासमोर फुटल्याने

अंबरनाथमध्ये पाणीच पाणी
अंबरनाथ : बॅरेज धरणातून अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी कल्याण-बदलापूर महामार्गावरील अंबरनाथ नगपरिषद कार्यालयासमोर फुटल्याने तीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ती २० फुट खोल असल्याने तिच्या दुरुस्तीमध्ये अडचणी येत होत्या. त्यातच दुरुस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते पंपाद्वारे बाहेर काढावे लागले. त्यामुळे हे सर्व पाणी मुख्य रस्त्यावर आले होते. तसेच मातीचाही ढीग साचल्याने सर्वत्र चिखल झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.