घरफोडी करणा-या चोरांनी केली वॉचमनची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:45 IST2018-01-29T22:41:57+5:302018-01-29T22:45:42+5:30
_201707279.jpg)
घरफोडी करणा-या चोरांनी केली वॉचमनची हत्या
भिवंडी : शहरालगत खोणी गावात घरफोडी करण्यासाठी अडसर ठरलेल्या वॉचमनची चोरांनी हत्या करून कारखान्याच्या कार्यालयांतील किमती सामान पळविले.
खोणी गावातील रिध्दी -सिध्दी कंपाऊण्डमध्ये अशोका टेक्सटाईल नावाचा यंत्रमाग कारखाना आहे.काल रात्री दरम्यान चोरी करण्याच्या उध्देशाने
कारखान्याच्या मागील बाजूस भगदाड पाडण्यास सुरूवात केली.याची खबर लागताच वॉचमन गुरूदेव पांडे याने त्यांना विरोध केला.तेंव्हा चोरांनी मिळून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला.तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उध्देशाने त्यांनी लोखंडी पाण्याची मोटार त्याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. कारखान्याच्या मागील पाडलेल्या भगदाडातून चोर कार्यालयांत शिरले आणि त्यांनी कार्यालयांतील एलईडी टिव्ही,डीव्हीआर मशीन,सीसीटिव्ही कॅमेरा,कॉम्प्रेसरपंप व वायरबंडल आदि सामान चोरून नेले. आज सकाळी कारखान्याचे व्यवस्थापक शंकर सिताराम सिंग हे कारखान्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.तेंव्हा त्यांनी ही घटना पोलीसांना कळविली.पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व वॉचमनचा मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरागांधी रूग्णालयांत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात वॉचमनच्या हत्येबाबत अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.