सोसायटीचे गेट उशिरा उघडल्याने वॉचमनला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:48+5:302021-05-30T04:30:48+5:30
कल्याण : सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर केल्याच्या कारणावरून स्टॅलिन जॉर्ज या तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चेनने बेदम मारहाण केली. ही ...

सोसायटीचे गेट उशिरा उघडल्याने वॉचमनला मारहाण
कल्याण : सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर केल्याच्या कारणावरून स्टॅलिन जॉर्ज या तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चेनने बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून कोळसेवाडी पोलिसांनी जॉर्जवर कारवाई केली.
कोळसेवाडी परिसरातील रंजना अपार्टमेंटमध्ये राहणारा स्टॅलिन जॉर्ज हा सोसायटीचा वॉचमन मुकेश थापा याला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन दिवसांपूर्वी स्टॅलिन सोसायटीत आला तेव्हा मुकेश हा काही कामात व्यस्त असल्याने गेट उशिराने उघडले. त्यामुळे जॉर्जने मुकेशला शिवीगाळ केली व तो घरी निघून गेला. सकाळी इमारतीखाली येऊन त्याने बुलेटच्या चेनने मुकेश याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुकेशला वाचविण्यासाठी एक महिला मध्यस्थी करण्यासाठी गेली असता तिलासुद्धा स्टॅलिनने मारहाण केली. कोळसेवाडी पाेलिसांनी जॉर्जला अटक केली.
............
वाचली