शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:24 IST

सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.

ठाणे : सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या नावाने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सायबर गुन्ह्यांचे तज्ज्ञ वकील राजस पिंगळे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एस.बी. सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे उपस्थित होते. डॉ. भाजीभाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अ‍ॅड. पिंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची खबरदारी याबाबत विस्तृत माहिती दिली. कुठेही गेलो की, फेसबुकवर ‘चेक इन’ करण्याची नेटकरींना हौस असते. मात्र याद्वारे घरी नसल्याची आपण माहिती जगभराला देतो. चोरांना हे आयतेच निमंत्रण असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. कोणतेही अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करताना आपण आपली खासगी माहिती वापरण्याची परवानगी त्रयस्थाला देत असतो. याचा दुरूपयोग होऊ शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. व्हॉटस्अ‍ॅपचे वेगवेगळे ग्रुप प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये असतात. या ग्रुपमधील सर्वच सदस्यांना आपण ओळखत नसतो. त्यामुळे कोणतीही पोस्ट ग्रुपमध्ये पाठवताना, ती कुणाचीही व्यक्तिगत किंवा जाती-धर्माची बदनामी करणारी तर नाही, याचा दहावेळा विचार करावा. अशा प्रकारची चूक फौजदारी कारवाईसाठी पुरेशी ठरू शकते. वधु-वर सुचक संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही अलीकडच्या वाढले आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यासाठी कोणती माहिती घेतली जावी, याबाबत सुधारित दिशानिर्देश तयार केले जात असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या सर्व शंकांचे डॉ. भाजीभाकरे आणि अ‍ॅड. पिंगळे यांनी निरसन केले.जागरूकता हाच उत्तम उपाय-सायबर गुन्ह्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. लोकांच्या अज्ञानाचा आणि गाफिलीचा ते पुरेपूर गैरफायदा घेतात. सुशिक्षित लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही अनेकदा घडतात.हे प्रकार रोखण्यासाठी सायबर सेलमार्फत प्रयत्न सुरू असले तरी सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी जागरूकता बाळगल्यास हे प्रमाण बºयापैकी कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनीयावेळी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिस