केडीएमसीच्या वाहनांवर ‘वॉच’

By Admin | Updated: April 1, 2017 05:38 IST2017-04-01T05:38:28+5:302017-04-01T05:38:28+5:30

केडीएमसीच्या वाहनांमध्ये लवकरच जीपीएस प्रणाली बसवली जाणार आहे. महापालिका प्रशासनाला यामुळे आपल्या

Watch on KDMC vehicles | केडीएमसीच्या वाहनांवर ‘वॉच’

केडीएमसीच्या वाहनांवर ‘वॉच’

कल्याण : केडीएमसीच्या वाहनांमध्ये लवकरच जीपीएस प्रणाली बसवली जाणार आहे. महापालिका प्रशासनाला यामुळे आपल्या वाहनांवर वॉच ठेवणे शक्य होणार आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाकडून या संदर्भात दाखल झालेल्या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांनी हिरवा कंदील दाखवला. महापालिकेच्या ३१२ वाहनांमध्ये ही प्रणाली बसवण्यात येणार असून, यासाठी प्रशासनाला एक कोटी ४२ लाख १७ हजार १०० रुपयांचा खर्च येणार आहे.
वाहनांवर ट्रेकींग सिस्टीम बसविण्यासाठी यापूर्वीच महासभेत मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी प्रस्ताव चर्चेला येताच त्याला एकमताने मान्यता देण्यात आली. जुन्या वाहनांना ही प्रणाली बसवू नका, अशी सूचना सदस्य राहुल दामले यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा विभाग, रुग्णालय, अग्निशमन दलाची वाहने, विद्युत आणि उद्यान विभागील वाहने, महापालिकेच्या ताफ्यातील अन्य कार, जीप तसेच २७ गावांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ही प्रणाली बसवली जाणार आहे. यातून वाहन कुठे जाते, कुठे थांबते, किती वेळ थांबली आहे, कोणत्या मार्गावर आहे, किती फेऱ्या झाल्या आहेत, हे कळणार आहे.
दरम्यान, या वेळी सदस्य मोहन उगले यांनी फडके मैदानात उभ्या केलेल्या घनकचरा गाड्यांच्या २६ बटऱ्या चोरीला गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे का?, असा सवाल त्यांनी केला. तेथे तीन सत्रांत सुरक्षारक्षक तैनात असतानाही चोऱ्या कशा झाल्या, याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागितला आहे का? अशीही विचारणा त्यांनी केली. या वेळी प्रशासनाकडून उपस्थित असलेले उपायुक्त धनराज तोरस्कर यांनी माहिती घेऊन सांगतो, असे स्पष्टीकरण स्थायीला दिले. (प्रतिनिधी)

निवडणुकीच्या मंडपावर कोट्यावधींचा खर्च
२०१५ मध्ये केडीएमसीच्या झालेल्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजारात समितीच्या आवारात उभारलेल्या मंडप आणि अन्य केलेल्या व्यवस्थेसाठी आलेल्या १ कोटी १८ लाख ९३ हजार ७७५ रुपयांच्या खर्चालाही स्थायी समितीने मान्यता दिली.
मात्र, हा प्रस्ताव विलंबाने का दाखल केला, असा सवाल सदस्यांकडून उपस्थित केला. यावर कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे एका अन्य प्रकरणात निलंबित झाल्याने विलंब झाल्याचे कारण या वेळी प्रशासनाने दिले.
कृषी बाजार समितीत कॅन्डसेट,मोजणी, रंगीत तालिम, मतदान साहित्य वाटप व संकलन यासाठी मंडप उभारणे व सभोवताली निवडणूक सुरक्षिततेसाठी पत्रा, बॅरिकेटींग लावणे इत्यादी कामांसाठी टेबल-खुर्ची पुरवणे तसेच मतमोजणी केंद्राकरत फर्निचर व्यवस्था करणे, आदी कामांचा यात समावेश होता.

Web Title: Watch on KDMC vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.