शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

कल्याण पालिकेचेच कचरा फेको आंदोलन

By admin | Updated: March 22, 2017 01:33 IST

मोहनेतील बंद असलेल्या एनआरसी कंपनीने ५५ कोटींचा मालमत्ता कर थकवल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या

कल्याण : मोहनेतील बंद असलेल्या एनआरसी कंपनीने ५५ कोटींचा मालमत्ता कर थकवल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या आवारात दहा गाड्या भरून कचरा फेकण्याचे ‘आंदोलन’ कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले. त्यातून कंपनी व्यवस्थापनाला धडा शिकवणे राहिले दूर, उलट आपल्या आवारात डम्पिंग ग्राऊंड होते आहे, या समजातून नागरिकांनी तीव्र विरोध करत चार कचरा गाड्यांची तोडफोड केली. शेवटी हा प्रकार मिटविण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. यापढेही कर थकवणाऱ्यांच्या दारी कचरा टाकून त्यांना ‘समज’ दिली जाईल, अशा इशारा पालिकेने दिला आहे, तर करवसुलीची ही पद्धतच चुकीची असल्याची टीका लोकप्रतिनिधींनी केली आहे. महापालिकेचा २६२ कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. तो येत्या दहा दिवसांत वसूल करण्याचे लक्ष्य आयुक्त ई. रवींद्रन यांनी ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयाची झाडाझडती सुरु केली आहे. करवसूली कमी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणे, ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू आहे. एका रुग्णालयाला, वाधवा हॉलला आणि वाहनतळाला सीलही ठोकण्यात आले आहे. एनआरसी कंपनी पालिकेच्या हद्दीत आहे. ती ९ नोव्हेंबर २००९ पासून बंद आहे. तिने कामगारांची देणी दिलेली नाही. देणी आणि जागाविक्रीचा वाद न्यायालयात आहे. कंपनी प्रशासनाने ५५ कोटींचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्याच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाला वारंवार नोटिसा बजावून थकबाकी भरण्याची मागणी केली. पण या नोटिसांना प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारी आयुक्तांनी ‘कंपनीच्या आवारात जाऊन कचरा टाका,’ असा आदेश दिला. महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या दहा मोठ्या आणि चार लहान गाड्या कंपनीजवळ गेल्या. त्या पाहिल्यावर कंपनीच्या जागी डम्पिंगचा पालिकेचा डाव असल्याचा समज नागरिकांचा झाला आणि त्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आणि संतप्त नागरिकांनी चार कचरा गाड्यांची तोडफोड केली. एका कचरा गाडीचालकास मारहाण केली. त्यामुळे पालिकेचे अधिकारी सुनील पाटील यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मध्यस्थी करुन नागरिकांना शांत केले आणि नेमका काय प्रकार आहे, याची माहिती दिली. तेव्हा नागरिकांचा राग शांत झाला. महापालिकेने कंपनीच्या गेटचे कुलूप तोडून आत दहा कचरागाड्या नेल्या. तेथे अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर कचरा ओतून पालिकेचे अधिकारी परतले. मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या जागेवर यापुढे अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने या कृतीतून दिला आणि कारवाईपासून वाचण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरावा, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)