शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
4
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
5
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
6
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
7
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
8
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
9
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
10
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
11
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
12
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
13
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
14
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
17
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
18
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
19
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
20
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

३५ लाखांची लाच घेणारा अधिकारी 'या' ७ कोटींच्या शर्यतीत होता? ठाणे अतिक्रमण विभागातील धक्कादायक 'रस्सीखेच' उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:04 IST

ठाणे महानगरपालिकेतील ‘क्रिम पोस्टिंग’चा अतिक्रमण विभाग पुन्हा चर्चेत; शहरात बेकायदा बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर

अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरात बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले असताना आता त्याच विभागाच्या प्रमुखाने ३५ लाखांची लाच घेतल्याचे उघड झाल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपासून पालिकेचा अतिक्रमण विभाग हा क्रिम पोस्टिंगचा विभाग मानला जात आहे. येथे पोस्टिंग मिळण्यासाठी तीन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यासाठी पाच ते सात कोटींची बोली लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

आजही पालिका हद्दीत ३०० हून अधिक बेकायदा बांधकामे सुरू असल्याची आकडेवारी मध्यंतरी अतिक्रमण विभागानेच जाहीर केली होती. अनधिकृत बांधकामांबाबत २०२१ मध्ये तक्रार केली असता लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना दिवे, पाणी देऊ नये, असे आदेश दिले होते. तरीही इमारतींना या सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे लोकायुक्तांच्या आदेशानंतरही वीज आणि पाणीपुरवठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. 

कोरोना काळात बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून आजी-माजी अशा १४ सहायक आयुक्तांच्या चौकशीही झाली होती. परंतु त्या चौकशीचे पुढे काय झाले याचे उत्तर ठाणे महानगरपालिका आजही द्यायला तयार नाही.

दीड वर्षापूर्वी विभागाची जबाबदारीदीड वर्षापूर्वी अतिक्रमण विभागाची जबाबदारी शंकर पाटोळे यांच्यावर सोपविली. त्यानंतरही बेकायदा बांधकामांची यादी वाढतच गेली. एकूणच हा विभाग मागील काही वर्षात क्रिम पोस्टिंगचाच ठरला असल्याचे दिसून आले.

इमारतींवरील कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची एक ना अनेक कारणे २०१३ एप्रिलमध्ये मुंब्य्रात अशाच पद्धतीने लकी कम्पाउंड इमारत दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ७४ जणांचा जीव गेला होता. त्यात पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एक माजी नगरसेवकालाही अटक झाली होती. या दुर्घटनेनंतर बेकायदा बांधकामांचा सिलसिला थांबेल असे वाटत होते. 

कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर अगदी नौपाड्यातही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदा बांधकामे उभी राहिली. अशातच मध्यंतरी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला अशा बांधकामांवर कारवाई करण्यास सांगितल्यानंतर मुंब्रा - शीळ भागातील २१ इमारतींवर कारवाई केली. 

ठाणे पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवरील कारवाया टाळण्यासाठी महापालिकेच्या याच अतिक्रमण विभागाकडून कधी पोलिस बंदोबस्त नाही, कधी नागरिक आक्रमक होत असल्याचे तर कधी सण-उत्सव अशी अनेक कारणे देत अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. 

बेकायदा बांधकामासाठी रॅकेटच केले सक्रिय  लकी कम्पाउंड दुर्घटना घडली तेव्हा या विभागाच्या प्रमुखासह एकाला अटक झाली होती. त्यानंतर या विभागाची जबाबदारी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली.  नव्याने जबाबदारी दिल्यानंतरही अनधिकृत बांधकामे थांबली नाहीत. उलट स्लॅबमागे घेण्यात येत असलेल्या पैशांच्या आकड्यात वाढ हाेत गेल्याचे या कारवाईच्या निमित्ताने समाेर आले आहे.  राजकीय इच्छाशक्तीमुळे एका अधिकाऱ्याच्या अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा कार्यभार सोपविला आणि बांधकामे सुरू झाली. यातून कलेक्शनसाठी बाहेरची मंडळी ठेवली गेली. एकप्रकारे बांधकामांची रिंगच तयार केल्याचा दावा त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Encroachment Department in the Race for Crores, Official Bribed?

Web Summary : Thane's encroachment department faces scrutiny after an official was caught taking a bribe. Allegations suggest a high-stakes competition for postings within the department, fueled by illegal construction activities and a lack of accountability despite past inquiries.
टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारthaneठाणे