आदिवासींसाठी वारली चित्रशैली रोजगाराचे साधन
By Admin | Updated: February 19, 2016 02:17 IST2016-02-19T02:17:58+5:302016-02-19T02:17:58+5:30
वारली कलेची जोपासना करणाऱ्या आदिवासींची वारली ही प्रमुख जात आहे़ या कलेचे आणि आदिवासी जमातीचे घनिष्ट नाते आहे़ वारली चित्रशैलीचा मोठया प्रमाणात प्रसार

आदिवासींसाठी वारली चित्रशैली रोजगाराचे साधन
राहुल वाडेकर, तलवाडा
वारली कलेची जोपासना करणाऱ्या आदिवासींची वारली ही प्रमुख जात आहे़ या कलेचे आणि आदिवासी जमातीचे घनिष्ट नाते आहे़ वारली चित्रशैलीचा मोठया प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत असल्याने आदिवासींना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होत आहे़ आजच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येकाचा प्रत्येक कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालेला आहे़ आज कलाही रोजगाचे व करिअरचे साधन बनत असून त्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होत आहे़ पूर्वी कला ही छंदासाठी व आवडीसाठी व परंपरागतेनुसार जोपासली जात असे़ मात्र आज कला ही एक उदनिर्वाहाचे तसेच करिअरच्या दृष्टीने महत्वाची ठरु लागली आहे़ ग्रामीण भागातील हीच एक वारली कला आज सातासमुद्रापलिकडे पोहचली आहे़ ही कला जपण्यासाठी काही सामाजिकसंस्थेबरोबरच आदिवासी युवकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत़ परदेशात होणाऱ्या प्रदर्शनातून वारली चित्रकलेच्या वस्तूंची विक्री केली जात असून ग्राहकांची त्याला चांगली मागणीही आहे़
या वारली चित्रशैलीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला तो डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील आदिवासी समाजाचे जीवा सोमा मशे यांच्यामुळे.
जीवा मशे यांना या कामगिरीसाठी आतापर्यत ४३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे़ त्यांची दोन मुले जपानमध्ये वारली चित्रशैलीचे शिक्षण देत आहेत़ आदिवासीसांठी वारली चित्रकला रोजगाराचे साधन झाली आहे़ या चित्रशैलीला नवी झळाळी प्राप्त झाली आहे़
नुुकतेच ठाणे-खारीगाव येथे फेस्टीव्हलचे आयोजन करण्यांत आले होते़ त्यांच्या हस्ते या फेस्टीव्हलचे उदघाटन करण्यांत आले. व त्यात त्यांची वारली पेटींग्ज मांडण्यात आली आहे़त त्यांना रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.