डोंबिवलीतील इमारतीमधील गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST2021-07-16T04:27:27+5:302021-07-16T04:27:27+5:30

डोंबिवली : पूर्वेतील रेल्वे स्थानकालगत असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील गोदामाला गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास भीषण ...

Warehouse fire in a building in Dombivali | डोंबिवलीतील इमारतीमधील गोदामाला आग

डोंबिवलीतील इमारतीमधील गोदामाला आग

डोंबिवली : पूर्वेतील रेल्वे स्थानकालगत असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील गोदामाला गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ही घटना घडताच इमारतीमधील रहिवासी व दुकानदारांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सुत्रांच्या माहितीनुसार लक्ष्मी निवास इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका घरातील गोदामात फेरीवाल्यांनी सामान ठेवले होते. त्याला ही आग लागली होती. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले. स्थानक परिसरातील पादचारी पुलावर पाहणाऱ्यांनी गर्दी केली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर, अर्धा तासानंतर आग नियंत्रणात आल्याची माहिती केडीएमसीच्या अग्निशमन दलाचे उपअधिकारी रवींद्र गोवारी यांनी दिली. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही.

---------

Web Title: Warehouse fire in a building in Dombivali