शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत गोदाम इमारत कोसळली; १ मृत्यू तर ६ जखमी, ढिगाऱ्याखाली ४-५ जण अडकल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 14:52 IST

दापोडा ग्राम पंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळ मजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाईन पार्सल कंपनी असून या कंपनीत ऑनलाईन साहित्य पार्सल करण्यात येत होते.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १ ) भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एका सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवांनासह, भिवंडी व ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र तसेच  ठाणे आपत्ती प्रतिसाथ पथक त्याच बरोबर एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे. 

दापोडा ग्राम पंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळ मजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाईन पार्सल कंपनी असून या कंपनीत ऑनलाईन साहित्य पार्सल करण्यात येत होते. सुमारे ७० हुन अधिक कामगार या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत असून सोमवारी दुर्घटना झाल्यावेळी या कंपनीत सुमारे ५० ते ५५ कामगार उपस्थित होते. तर पहिल्या मजल्यावर मार्क इम्पेक्स हि टीव्ही व इलेक्टरोनिक साहित्याची कंपनी होती ज्यात सहा ते सात कामगार काम करीत होते, टीव्ही कंपनीतील हे सर्व कामगार सुरक्षीत असल्याची माहिती मिळत आहे. तर गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम देखील सुरु होते , सुदैवाने हे मजूर देखील या दुर्घटनेत वाचले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे तळ मजल्यावर काम सुरु असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली व परिसरात व कंपनीत एकच गोंधळ उडाला . यावेळी २५ ते ३० कामगार धावत बाहेर पळाले. 

यावेळी या कंपनीत सिक्युरिटी काम करत असलेल्या सौरभ त्रिपठी ( वय ३० अंदाजे ) या कामगाराने सुमारे २० ते २५ लोकांना बाहेर काढले, व इतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत असतांना सिक्युरिटी कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत सुनील कुमरा , कल्पना पाटील , रोशन पागी , अक्षय केनी , शैलेश तरे , व इतर एक असे सहा जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्व इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून इमारत पूर्णतः कोसळली असल्याने कामगारांना वाचविण्यासाठी बचाव पथका कडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घनेत कामगारांनी पार्क करून ठेवलेल्या दुचाकींसह माल भरणे व उतरण्यासाठी गोदामाला लागलेल्या कंटेनरवर इमारतीचा काही भाग कोसळल्याने या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना