वाहतूक कोंडी सोडवणा-या वॉर्डनची दिवाळी अंधारात ७५ वॉर्डनची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:14 IST2017-10-26T14:10:54+5:302017-10-26T14:14:48+5:30

दिवसातले १२ तासांहून अधिक वेळ बाराही महिने उभे राहणा-या वार्डनची दिवाळी अंधारात गेली आहे. तीन महिन्यांनी मिळणारा पगार झाला नसल्याने सगळीकडे दिवाळीत जल्लोषाचे वातावरण असतांना वॉर्डनमध्ये नाराजीचे वातावरण

The Warden's problem of reducing the traffic jam is 75 Wardon's problem in the dark | वाहतूक कोंडी सोडवणा-या वॉर्डनची दिवाळी अंधारात ७५ वॉर्डनची समस्या

कल्याण-डोंबिवली-कोळशेवाडीच्या वॉर्डनची समस्या

ठळक मुद्देकल्याण-डोंबिवली-कोळशेवाडीच्या वॉर्डनची समस्या

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. ती कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आणि त्यांचे सहकारी वॉर्डन प्रयत्न करतात. दिवसातले १२ तासांहून अधिक वेळ बाराही महिने उभे राहणा-या वार्डनची दिवाळी अंधारात गेली आहे. तीन महिन्यांनी मिळणारा पगार झाला नसल्याने सगळीकडे दिवाळीत जल्लोषाचे वातावरण असतांना वॉर्डनमध्ये नाराजीचे वातावरण होते.
कल्याण,डोंबिवली आणि कोळसेवाडी या वाहतूक विभागात कार्यरत असणा-या ७५ वॉर्डनला ही समस्या भेडसावली. डोंबिवलीतील काही वॉर्डनने लोकमतशी बोलतांना ती नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दिवाळीचा बोनस सोडाच पण जे महिन्याचे ५ हजार रुपये मिळतात ते पण वेळेत मिळत नाहीत. तीन महिन्यांनी ते मानधन मिळते. हे मानधन तुटपुंजे असून ते देखिल वेळेत न मिळाल्या कुटूंबियांची होणारी परवड बघवली जात नाही. दिवाळीतही सगळीकडे उत्साह होता, पण आमच्या घरांमध्ये मात्र लहान मुले देखिल त्या आनंदापासून वंचित राहील्याची खंत व्यक्त करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पेमेंट मिळते, पण ते वेळेत मिळत नाही. ते वेळेत मिळाल्यास समाधान मिळेल असे सांगण्यात आले.
कोट: वॉर्डनचे पेमेंट वेळेत होत नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी आमच्या विभागाकडून मात्र वेळच्या वेळी महिन्याला पत्रव्यहार केला जातो. दिवाळीत त्यांचे मानधन आलेले नाही. ते जसे येते तसे त्याचे तातडीने वाटप केले जाते - बाबासाहेब आव्हाड, एसीपी,वाहतूक विभाग-कल्याण

Web Title: The Warden's problem of reducing the traffic jam is 75 Wardon's problem in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.