धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वॉर्डनला अटक

By Admin | Updated: July 9, 2016 03:41 IST2016-07-09T03:41:45+5:302016-07-09T03:41:45+5:30

सोशल मीडियावर मुस्लिम धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने भिवंडी तसेच पडघा-बोरिवली येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत आक्षेपार्ह

Warden arrested for creating religious turmoil | धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वॉर्डनला अटक

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वॉर्डनला अटक

भिवंडी : सोशल मीडियावर मुस्लिम धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने भिवंडी तसेच पडघा-बोरिवली येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
सोशल मीडियावर मोहम्मद पैगंबर यांच्याबाबतीत आक्षेपार्ह मजकूर एका पोलिसाने टाकल्याची व तो सर्वांना पाठवल्याची बातमी पसरली. रमजान ईदच्या दुसऱ्याच दिवशी शुक्र वार असल्याने दुपारच्या नमाजानंतर याबाबत संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम समुदायातून उमटू लागल्या. नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. कल्याणनाका, जकातनाका येथे नागरिकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. परंतु, जवळच असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त मनोज पाटील तातडीने घटनास्थळी फौजफाट्यासह गेले व जमावास पांगवले.
अंजूरफाटा परिसरात खासगी ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करणाऱ्या विजय पाटील याने हा आक्षेपार्ह प्रकार केल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. त्याला ताब्यात घेतले आहे. तो पोलीस नसल्याची खात्री पटल्यावर जमाव शांत झाला.
या प्रकरणाची माहिती कळताच पडघा परिसरातसुद्धा तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने सुरुवातीला मुंबई- नाशिक महामार्गावरील आरजोली येथील टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न केला. तेथे पोलिसांनी हस्तक्षेप केला. आरोपीला भिवंडीत अटक केली असल्याचे सांगितल्यावर जमाव शांत झाला. भिवंडी शहर व पडघा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Warden arrested for creating religious turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.