रुग्णाच्या नातेवाइकांना वॉर्डबॉयची धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST2021-09-12T04:46:11+5:302021-09-12T04:46:11+5:30

कल्याण : केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एक वॉर्डबॉय शनिवारी गाढ झोपेत असताना त्यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी उठविले. त्यामुळे त्या वॉर्डबॉयने त्यांना ...

Wardboy's pushback to the patient's relatives | रुग्णाच्या नातेवाइकांना वॉर्डबॉयची धक्काबुक्की

रुग्णाच्या नातेवाइकांना वॉर्डबॉयची धक्काबुक्की

कल्याण : केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एक वॉर्डबॉय शनिवारी गाढ झोपेत असताना त्यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी उठविले. त्यामुळे त्या वॉर्डबॉयने त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन वादात सापडले आहे.

शनिवारी पहाटे आनंद नवसागरे यांच्या वडिलांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे आनंद यांनी त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तेथे बाह्यरुग्ण कक्षाच्या बाहेर वॉर्डबॉय गाढ झोपेत होता. तसेच कक्षाच्या आत नर्स झोपलेली होती. आनंद यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासानंतर जागा झालेल्या वॉर्डबॉयने आनंद यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच धक्काबुक्कीही केली. रुग्णालयातील इतर कर्मचारी हा गोंधळ पाहून तेथे आले. अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करूनही हा वॉर्डबॉय ऐकत नव्हता. या घटनेमुळे रुग्णालय व्यवस्थापन वादात सापडले आहे. दरम्यान, आनंद यांनी अखेरीस त्यांच्या वडिलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

‘दोषींवर कारवाई करणार’

या संदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशी करून दोषींच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.

--------------------------

Web Title: Wardboy's pushback to the patient's relatives