शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

प्रभाग समित्यांची खरोखर गरज आहे का?

By admin | Updated: July 3, 2017 06:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकांतर्गत असलेल्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका बुधवारी होत आहेत. प्रभाग स्तरावरील नागरी समस्यांचे

प्रशांत माने/लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकांतर्गत असलेल्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका बुधवारी होत आहेत. प्रभाग स्तरावरील नागरी समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने या समित्या स्थापन करण्यात आल्या असल्या, तरी वर्षभराचा या समित्यांचा कारभार पाहता त्यांच्या फारशा बैठकाही झाल्या नाहीत. परिणामी, प्रभागातील समस्या आणि प्रश्न जैसे थे राहत असल्याने वारेमाप खर्च होणाऱ्या समित्यांची गरजच काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कल्याण - डोंबिवली महापालिकेंतर्गत प्रारंभी सात प्रभाग होते. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रभागरचनेत बदल होऊन आज १० प्रभाग अस्तित्वात आहेत. प्रभाग स्तरावरील भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांचा समावेश असणाऱ्या प्रभाग समित्या स्थापन झाल्या. प्रभाग अधिकारी आणि नगरसेवकांची महिन्याला साधारण एकतरी बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, वर्षभराचा आढावा घेता काही समित्यांचा अपवाद वगळता काहींची एकही बैठक झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. ड प्रभाग याचे उदाहरण असून इतर प्रभागांतही जेमतेम ५ ते ६ बैठका झाल्या आहेत. तर, ह प्रभागात झालेल्या बैठका या बहुतांशवेळा गणसंख्येअभावी तहकूब कराव्या लागल्या आहेत. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांना २५ हजार रुपये वाहनभत्ता मिळतो तसेच तीन हजार अतिथीभत्ताही मिळतो. याउपरही काही अपवाद वगळता काही अध्यक्षांना बैठकांचे वावडे असल्याने त्यांच्यावर नाहक खर्च करायचा तरी कशाला, असा सवालही उपस्थित होत आहे. प्रभाग स्तरावर पुरेशा बैठका होत नसल्याने प्रभागातील समस्यांवर स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये प्रभागातील समस्यांच्या चर्चेचे गुऱ्हाळ कायम सुरू असते. जर प्रभाग स्तरावर नियमित बैठका होऊन तेथेच समस्यांचे निराकरण झाले, तर स्थायी आणि महासभेचा निरर्थक वेळ वाया जाणार नाही, याचीही जाण नगरसेवकांना नसणे, ही शरमेची बाब आहे. याला अपवाद ग आणि फ प्रभाग समिती ठरली असून त्यांच्या नियमित बैठका होतात. समित्यांना आर्थिक अधिकार नसणे, हे प्रमुख कारण या उदासीनतेला पोषक असे ठरत असून त्यामुळेच बैठका घेतल्या जात नसल्याचे बोलले जाते. अंदाजपत्रकाचे अधिकार मिळावेतमुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रभाग स्तरावर अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार मिळावेत, अशीही मागणी होत आहे. आता पुन्हा एकदा प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. यावेळी दहाही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहेत. एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. बुधवारी यावर शिक्कामोर्तब होईल. नव्याने निवडून येणाऱ्या अध्यक्षांनी तरी नियमित बैठका घेऊन प्रभागस्तरावरील समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर करावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.