वॉर्ड बॉय भरतीवरून महासभेत गदारोळ

By Admin | Updated: December 22, 2016 05:59 IST2016-12-22T05:59:11+5:302016-12-22T05:59:11+5:30

कळवा रुग्णालयातील वॉड बॉय भरतीचा मुद्दा स्थायीनंतर, मंगळवारी झालेल्या महासभेतदेखील चांगलाच गाजला. दुसरीकडे

Ward boy recruitment scandal in the General Assembly | वॉर्ड बॉय भरतीवरून महासभेत गदारोळ

वॉर्ड बॉय भरतीवरून महासभेत गदारोळ

ठाणे : कळवा रुग्णालयातील वॉड बॉय भरतीचा मुद्दा स्थायीनंतर, मंगळवारी झालेल्या महासभेतदेखील चांगलाच गाजला. दुसरीकडे सदस्यांनी पालिकेने केलेल्या स्टुलमॅनच्या भरतीवरदेखील यावेळी आक्षेप घेतला. स्टुलमनच्या सुधारित यादीत जुन्या यादीमध्ये नसलेल्या उमेदवारांची नावे टाकल्याचा मुद्दा उपस्थित करून नजीब मुल्ला यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. मात्र, मुल्ला यांनी अशी नावे जाहीर केल्यास २४ तासांच्या आत यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल आणि मुल्ला यांची माहिती खोटी ठरल्यास त्यांनी आपले आरोप सभागृहातच मागे घेण्याचे आव्हान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात दिल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते.
स्थायी समितीमध्ये वॉर्ड बॉयची भरती रद्द करण्याचे आदेश असताना अजूनही सर्व वॉर्ड बॉय कामावर रु जू असल्याचा मुद्दा मुल्ला यांनी उपस्थित केला. तर ही भरती प्रक्रि या राबवताना जाहिरात देण्यात आली नसून शासनाच्या अध्यादेशाचेदेखील पालन केले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. रामभाऊ तायडे यांनी हॉस्पिटलच्या डीन, अधीक्षक कोरडे यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. ही संपूर्ण भरती तात्पुरती असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणखांब यांनी सांगूनही समाधान न झाल्याने ही भरती प्रक्रि या रद्द करून चौकशी करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी सभागृहामध्ये दिले.
स्टुलमॅनच्या भरतीसंदर्भात यापूर्वी सदस्यांनीघेतलेल्या आक्षेपांवर एक समिती स्थापन करून चौकशी अहवाल सभागृहासमोर सादर करावा असा ठराव झाला असतानाही तो सभागृहासमोर न आणता परस्पर आयुक्तांकडे पाठवल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.
भरतीसंदर्भात आक्षेप आणि तक्र ारी या समितीकडून मागवल्या होत्या. मात्र, त्या कोणत्या स्वरूपातील होत्या, असा प्रश्न नगरसेवक हिरा पाटील यांनी केला. प्रशासनाकडून उत्तर देताना उपायुक्त मुख्यालय निपाणी यांनी यासंदर्भात चौकशी अहवाल तयार करून तो आयुक्तांना सादर केल्याची माहिती दिली. निपाणीच्या या उत्तरानंतर मुल्ला यांनी आक्षेप घेऊन ठराव सभागृहाचा असताना या ठिकाणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ward boy recruitment scandal in the General Assembly