उल्हासनगर : पाकिस्तानला अमेरिकेसह चीन, इंग्लंड, रशिया शस्त्रसाठा पूरवित असल्याने, येत्या दोन महिन्यात पाकिस्तान व भारत युद्ध होण्याचे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील सभेत वर्तवले आहे. हे युद्ध देशातील जनतेवर नसून, मोदीच्या ध्येय धोरणावर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन सुभाष टेकडी येथील मैदानात आयोजण केले होते. मैदानात उच्चांकी सभा झाली. आंबेडकर यांनी मोदी यांच्यावर चौफर टिका केली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मत चोरी झाली असून रात्री ६ नंतर ४६ लाख मतदान झाले. याबाबत एकत्रित आवाज उठविण्याचा सल्ला विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिला. मात्र मोदीच्या पोस्टर्सला भिणाऱ्यां नेत्यांनी आवाज उठवून न्यायालयाचे दार ठोठावले नाही. आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत नियमावली मतदान रेकॉर्डची प्रत मागितली. मात्र आज पर्यंत आयोगाने रेकॉर्ड दिले नाही.
रशियाचे अध्यक्ष पुतीन भारतात आले. त्यांनी भारताला काय दिले व भारताने रशियाला काय दिले? असा प्रश्न आंबेडकर यांनी मोदीना केला. जागतिकस्तरावर भारत एकाएकी पडला असून पाकिस्तानला अमेरिका, चीन, रशिया व इंग्लंड शस्त्रसाठा पूरवित आहे. याचा परिणाम पाकिस्तान येत्या दोन महिन्यात भारता सोबत युद्ध करणार आहे. असे भाकीत आंबेडकर यांनी केले. हे युद्ध देशातील जनते विरोधात नसून मोदी विरोधात असेल असेही म्हणाले. मोदी यांची माजोरी उतरविण्यासाठी पाकिस्तानाला शस्त्रसाठा देऊन, भारताचा काटा काढण्याचे काम काही देश करीत आहेत. मागच्या १० दिवसापूर्वी एका चव्हाण नावाच्या आर्मीने युद्धाला तोंड फुटणार असल्याचे वक्तव्य केले. असे आंबेडकर म्हणाले.
मुंबई व परिसरात देशाची धडकन मुंबई व परिसर देशाची धडकन असून परिसरात घडणाऱ्या घटनेचे प्रतिबिंब देशात उमटते. म्हणूनच महापालिका निवडणुकीला महत्व निर्माण झाले. मते कोणालाही दया, पण मोदी जिंकून आला नाही पाहिजे, हे बघा. असे आंबेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले.
मोबाईल व ईव्हीएम मशीनचे मेमरी कार्ड कोणाचे मोबाईल वापरताना त्यातील माहिती डिलीट करता येते. ज्या देशाने मोबाईल, ईव्हीएमची मेमरी चिप बनविली. त्या देशाबाबत मोदीनी खुलासा करावा. असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
Web Summary : Prakash Ambedkar predicts India-Pakistan war within two months, fueled by global arms supply to Pakistan. He criticized Modi's policies, alleging election fraud and questioning India's international standing. He urged voters to oppose Modi in upcoming elections, raising concerns about EVM security.
Web Summary : प्रकाश आंबेडकर ने पाकिस्तान को वैश्विक हथियारों की आपूर्ति के कारण दो महीने के भीतर भारत-पाकिस्तान युद्ध की भविष्यवाणी की। उन्होंने मोदी की नीतियों की आलोचना की, चुनाव में धोखाधड़ी का आरोप लगाया और भारत की अंतर्राष्ट्रीय स्थिति पर सवाल उठाया। उन्होंने मतदाताओं से आगामी चुनावों में मोदी का विरोध करने का आग्रह किया, और ईवीएम सुरक्षा पर चिंता जताई।