शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींमधील रहिवासी धोरणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 23, 2017 05:29 IST

पूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही आता अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून झालेली आहे. वागळे

अजित मांडके/ ठाणेपूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही आता अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून झालेली आहे. वागळे, किसननगर, लोकमान्यनगर, मुंब्रा, दिवा अशा शहराच्या सर्व भागात अनधिकृत इमले उभे राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी या बांधकामांना दिलासा देण्याच्या घोषणा होतात, पण त्यांना हक्काचे घर आजतागायत मिळालेले नाही.बिल्डर, भूमाफिया, स्थानिक गुंडांसोबतच पालिका अधिकारी आणि राजकारण्यांच्या आशीर्वादानेच ही अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. मात्र त्यावर पुढे काही झाले नाही. डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलेली बांधकामे मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून नियमित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आधीच ठाण्यातील अधिकृत बांधकामांना सोयीसुविधा पुरवण्यात पालिका कमी पडत असताना या निर्णयामुळे पालिकेपुढील आव्हाने वाढली आहेत. अधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्नही असाच जटील बनला आहे. या इमारती रिकाम्या करण्यात येत असल्या, त्यातील रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात पालिका पुनर्वसन करीत असली, तरी त्याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने त्यांना हक्काचे घर मिळण्यात अडचणी येत आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा विचार केल्यास ठाण्यात २५२ झोपडपट्ट्यांत ९ लाख ८३ हजार रहिवासी आहेत. अन्य अनधिकृत बांधकामांची संख्या एक लाख २३ हजारांच्या घरात आहे. ती नियमित केल्यास पालिकेपुढील आव्हाने वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात शासनाच्या अटी आणि शर्ती या अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या भूखंडांचा यात समावेश होणार आणि कोणते वगळणार हेदेखील गुलदस्त्यात आहे. पालिकेसोबतच राज्य सरकार, सीआरझेड, वन विभाग आणि एमआयडीसी अशा विविध प्राधिकरणांचे भूखंड आहेत. त्यावरही अनधिकृत बांधकामे उभी आहेत. त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणीसंकट गडद होत असून पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळू शकलेले नाही. वाहनांची संख्या १५ लाखांच्या घरात असून दरवर्षी वाहनवाढीचा दर ८ ते १० टक्के आहे. परंतु रस्ते अपुरे असल्याने शहराच्या विविध भागात वाहतूककोंडी होते. त्यामुळे अनधिकृत इमारतींचा विचार करूनच पुढील सोयीसुविधांचे नियोजन करावे लागेल.युती सरकारने शिवशाही योजनेच्या नावाखाली मुंबईत झोपडीधारकांना मोफत घरे देण्याची योजना आणली. त्यानंतर, राज्यात झोपड्यांचे पेव फुटून प्रत्येक शहराला झोपड्यांनी वेढले.आधी १९९५ तर २००० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याचे ठरले. ही सवलतीची मर्यादा वाढत असल्याने आणि अनधिकृत बांधकामे किंवा झोपड्या बांधणाऱ्यांवर कधीच कारवाई होत नसल्याने त्याचे प्रमाण सतत वाढते आहे.अनधिकृत बांधकामांना माणुसकीच्या भावनेतून सुविधा पुरवाव्याच लागतात. त्या अधिकृत झाल्यावर त्यांच्याकडून करही वसूल केला जाईल.