शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना प्रतीक्षा ओळखपत्राची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:36 IST

नऊ हजार ५३१ फेरीवाल्यांना लवकरच ओळखपत्र दिले जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी १८ जुलैला झालेल्या नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीत दिली होती

कल्याण : केडीएमसीने २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीतील नऊ हजार ५३१ फेरीवाल्यांना लवकरच ओळखपत्र दिले जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी १८ जुलैला झालेल्या नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीत दिली होती. परंतु, महिना उलटूनही यासंदर्भात एजन्सी नेमण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. एकीकडे सुरू असलेली कारवाई आणि दुसरीकडे ओळखपत्र देण्यास होणारा विलंब, यामुळे फेरीवाल्यांमध्ये असंतोष असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वेस्थानकापासून १५० मीटरपर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असल्याचे पाहावयास मिळते. डोंबिवलीत तर फेरीवाले विरुद्ध अधिकारी, असा संघर्ष सुरू आहे.शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली होती. त्यादृष्टीने एप्रिलमध्ये काही प्रभागांमध्ये पांढरे पट्टेही मारले गेले. मात्र, तेथे आजपर्यंत फेरीवाल्यांचे स्थलांतर झालेले नसल्याने फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. १८ जुलैला नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीत सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुनर्वसनाचा मुद्दा लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा होती.शहरात नव्याने दाखल झालेल्या फेरीवाल्यांचेही आता सर्वेक्षण केले जाणार असून त्यादृष्टीनेही कार्यवाही सुरू केली जाईल, असे बोडके यांनी सांगितले होते.ओळखपत्र देण्यासाठी एजन्सी नेमण्यात येणार होती, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार होती. परंतु, नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीला एक महिना होऊनही प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याकडे भाजीपाला, फळे-फुले फेरीवाला कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी लक्ष वेधले आहे. प्रशासनाला फेरीवाला पुनर्वसनाचे कोणतेही देणेघेणे नसून ते केवळ गटार-पायवाटांच्या निविदा काढण्यातच मग्न आहेत. पुनर्वसन सोडा, पण कारवाईच्या माध्यमातून फेरीवाल्यांची अधिकाऱ्यांकडून पिळवणूक सुरू आहे. उपायुक्त सुरेश पवार जाणुनबुजून विलंब लावत आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :hawkersफेरीवालेkalyanकल्याण