लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारसपणे आढळलेल्या दोन मोटार कारसह तब्बल २४ वाहनांचा वागळे इस्टेट पोलिसांकडून जाहीर लिलाव लवकरच केला जाणार आहे. यामध्ये सात रिक्षा, १३ मोटारसायकली आणि एका टेम्पोचा समावेश आहे. एका आठवडयामध्ये संबंधितांनी ही वाहने नेली नाहीतर त्यांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ही २४ बेवारस वाहने उभी आहेत. ही वाहने घेऊन जाण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकांनी संबंधितांना फोनद्वारे तसेच वाहन मालकांच्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन ती घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. यात सहा वाहनांच्या क्रमांकाची प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कोणतीही नोंद आढळली नाही. तर आरटीओने दिलेल्या यातील १२ वाहन मालकांच्या पत्यावर वारंवार संपर्क साधूनही ते मिळाले नाही किंवा त्यांच्या पत्त्यामध्ये बदल झाल्याचे आढळले. यातील २४ पैकी तीन वाहन मालकांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी वाहन नेण्यास कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.‘विनाकारण बेवारस २४ वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. येत्या आठवडाभरात या बेवारस वाहनांच्या मालकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीतर त्यांचा लिलाव केला जाणार आहे.’दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलीस ठाणे
वागळे इस्टेट पोलीस करणार २४ बेवारस वाहनांचा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 13:10 IST
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारसपणे आढळलेल्या दोन मोटार कारसह तब्बल २४ वाहनांचा वागळे इस्टेट पोलिसांकडून जाहीर लिलाव लवकरच केला जाणार आहे. यामध्ये सात रिक्षा, १३ मोटारसायकली आणि एका टेम्पोचा समावेश आहे.
वागळे इस्टेट पोलीस करणार २४ बेवारस वाहनांचा लिलाव
ठळक मुद्दे अनेक वाहनांबाबत आरटीओकडेही नोंद नाही एका आठवडयाचा अल्टीमेटम