वाडा नगरपंचायतीला कोलदांडा भाजपाचा?

By Admin | Updated: May 23, 2016 02:24 IST2016-05-23T02:24:13+5:302016-05-23T02:24:13+5:30

या पंचायत समितीची काठावर असलेली भाजपच्या हातातली सत्ता वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी ते राहत असलेल्या वाडा या शहरासाठी घोषित होऊ घातलेल्या नगरपंचायतीला खोडा घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे

Wadha Nagar Panchayat BJP's coalition? | वाडा नगरपंचायतीला कोलदांडा भाजपाचा?

वाडा नगरपंचायतीला कोलदांडा भाजपाचा?

वसंत भोईर, वाडा
या पंचायत समितीची काठावर असलेली भाजपच्या हातातली सत्ता वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी ते राहत असलेल्या वाडा या शहरासाठी घोषित होऊ घातलेल्या नगरपंचायतीला खोडा घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. जनतेची पाठराखण करून नगरपंचायत मागावी तर पक्षाच्या हातून पंचायत समितीतील सत्ता जाते आणि सत्ता राखावी तर जनता मागणी करीत असलेली नगरपंचायतीची मागणी सोडून द्यावी लागते, अशा विचित्र कचाट्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सापडले आहेत.
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाचे असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या तालुक्यांच्या गावांसाठी नगरपंचायतींची घोषणा नुकतीच शासनाने केली आहे. मात्र वाडयासारख्या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला यातून वगळल्याने नगरपंचायत होण्यात कोणी कोलदांडा घातला. असा प्रश्न होता त्याचे उत्तर जनतेला मिळाले आहे. जिल्हा परिषदेने जिल्हयातील मोखाडा, विक्र मगड, तलासरी व वाडा या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्या संदर्भातील प्रस्ताव ७ नोव्हेंबर २०१५ रोजी ग्रामविकास विभागाकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार वरील चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीना नगर पंचायतीचा दर्जा देणे आवश्यक होते. मात्र ७ मे २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हयातील विक्रमगड,मोखाडा व तलासरी या नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली. मात्र यातून झपाटयÞाने विस्तारणाऱ्या वाडा सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगरविकास विभागाने ९ फेब्रुवारी २०१६ रोजी फक्त विक्र मगड येथे नगरपंचायत स्थापन करण्या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ विक्र मगड येथे नगरपंचायत करण्याचे राजकीय इच्छाशक्ती नेमकी कोणाची होती असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाने केवळ विक्रमगड चाच प्रस्ताव मागविल्याने जिल्हाधिकारी पालघर यांनी २२ मार्च २०१६ रोजी विक्र मगड येथे नगरपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. असे असताना विक्रमगड, तलासरी व मोखाडा येथे नगरपंचायतीची घोषणा झाली. मात्र वाडा यातून वगळल्याने कोणाचे राजकीय बळ कमी पडले की जाणीवपूर्वक वाडा वगळण्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे.
वाडा तालुका हा औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो कारखाने डी प्लस झोनमुळे वाडा तालुक्यात आहेत. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण या कंपन्यामुळे नोकरी कामधंद्यासाठी आलेल्यांची संख्या वाड्यात वाढली आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी येथे राहतात. त्यामुळे वाडा गावाचे नागरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. २०११ च्या जनगणने नुसार असणाऱ्या आकडेवारीपेक्षा दुपटीहून अधिक लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे वाडा गावात नागरी समस्यांचा ताण वाढत आहे. या नागरी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ग्रामपंचायतीची नसल्याने सर्वात आधी वाड्यात नगरपंचायत होणे अपेक्षित होते. वाड्याची नगरपंचायत व्हावी या करिता स्थानिकांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेकडे मागणी केली होती. तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्यापासून वाडावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र वाड्याला वगळल्याने जनतेत नाराजी पसरली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे वाड्यात राहात असून त्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा न मिळणे हा त्यांचा सत्ताकारणातील दुबळेपणा मानला जातो आहे. त्यामुळे ते त्यांच्या पक्षातच टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर स्थानिक पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होते. वाडा ग्रामपंचायतीचा संपूर्ण एकच गण आहे आणि येथे भाजपाचा सदस्य निवडून आला आहे.
सध्या वाडा पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता असून भाजपाचे ६, शिवसेना ५, राष्ट्रवादी कॉग्रेसचा १ असे पक्षीय बलाबल असून येथे नगरपंचायत झाली तर भाजपाचे संख्याबळ एकने कमी होते.
त्यामुळे वाडा पंचायत समितीचा आगामी पदाधिकारी निवडणूकीत याचा फटका भाजपाला बसू शकतो या भीतीने हा रडीचा डाव राज्यसरकारने खेळला आहे. च्वाडा येथे शहरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. ग्रामपंचायत हा विकास करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नगरपंचायत होणे गरजेचे आहे. जनतेच्या बाजूने आम्ही असू अशी प्रतिक्रि या श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी दिली. च्राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली लवकरच आम्ही नगर विकास मंत्र्याची भेट घेऊन नगरपंचायतीची निर्मिती करू अशी प्रतिक्रि या भाजपाचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांनी दिली. च्विष्णू सवरा हे जिल्हयाचे पालकमंत्री आहेत की आपल्या विक्र मगड मतदार संघाचे आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. चारही तालुक्याचे प्रस्ताव असताना शासनाने फक्त वाड्यालाच का वगळले? याचा जाब सवरांनाच विचारणे आवश्यक असून त्यामागे त्यांचे राजकीय हितसंबंध गुंतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी केला आहे.

Web Title: Wadha Nagar Panchayat BJP's coalition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.