ठाण्यातील मतदार १२ लाखांवर
By Admin | Updated: December 25, 2016 04:35 IST2016-12-25T04:35:22+5:302016-12-25T04:35:22+5:30
ठाणे पालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. जानेवारी २०१७ पर्यंत वयाची
ठाण्यातील मतदार १२ लाखांवर
ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. जानेवारी २०१७ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचाही या यादीत समावेश करण्यात येत असल्याने हा आकडा ७० हजारांनी वाढण्याचा अंदाज पालिकेने बांधला आहे.
निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत सध्या तरी ११ लाख ४८ हजार मतदारांची नोंदणी असली, तरी हा आकडा १२ लाखांची संख्या पार करेण्याची चिन्हे आहेत. पालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे पालिका निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील मतदारांची प्रारूप मतदारयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने पालिकेच्या निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. दुसरीकडे नव्या प्रभागरचनेनंतर ३३ प्रभागांमध्ये १३१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या पहिल्या प्रारूप यादीमध्ये ११ लाख ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, तीच विधानसभानिहाय असलेली यादी महापालिकेने प्रभागनिहाय प्रसिद्ध केली आहे. येत्या ५ जानेवारी २०१७ पर्यंत पुरवणी यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता असून त्यांनतर तीन ते चार दिवसांनी पालिका क्षेत्रातील अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
दुसरीकडे महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी महापालिका क्षेत्रामधील लोकसंख्या ही १२ लाख ६५ हजार ५५१ एवढी होती. मतदारसंख्या ९ लाख ९ हजार ५७३ एवढी होती. २०१२ च्या निवडणुकीमध्ये १८ लाखांच्यावर लोकसंख्या असून ११ लाख ९४ हजार ८३६ इतकी मतदार संख्या होती.