शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद, आज होणार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 08:27 IST

Maharashtra News: संत तुकाराम यांचा नुकताच अपमान करण्यात आला आहे. वांरवार महापुरुषांचे अपमान केले जात आहेत. महापुरुषांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले जात आहे. हा एक प्रकारचा कट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ठाणे  : संत तुकाराम यांचा नुकताच अपमान करण्यात आला आहे. वांरवार महापुरुषांचे अपमान केले जात आहेत. महापुरुषांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले जात आहे. हा एक प्रकारचा कट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद संपूर्ण राज्यभर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची सुरुवात शुक्रवारी पुण्यातून होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली, तर हे अराजकीय व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धिरेंद्र याने तुकाराम महाराजांचा अपमान केला असून, तो चप्पल खाण्याच्या लायकीचा आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी उपहासात्मक बोलून त्यांचा अपमान करायचा आणि महापुरुषांचा इतर कुणाशी तरी तुलना करायची, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्याची गरज असून, त्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद राज्यभर घेण्यात येणार आहे. या परिषदांमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, वैशाली डोळस आणि संभाजी भगत हे सहभागी होणार असून, हे अराजकीय व्यासपीठ असेल.  

पुरोगामी नेते नास्तिक, हे असत्यउद्या पुण्यातील टिळक स्मारक परिसरात ही परिषद होणार आहे.  इतर परिषदांमध्ये अमोल मिटकरी हेही सामील होणार आहेत, असेही आव्हाड म्हणाले. राज्याची संत परंपरा पुढे समाजसुधारकांच्या हाती गेली आणि त्याचा टप्पा म्हणजेच फुले दाम्पत्य. त्यामुळेच भिडे वाड्यात नतमस्तक होऊन त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन या परिषदेत सामील होणार आहे. पुरोगामी नेते नास्तिक असतात, असे सातत्याने बोलले जाते. पण, ते सत्य नाही.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्र