स्वागतयात्रेत शहरी अन ग्रामीण ठाण्याचे दर्शन

By Admin | Updated: March 22, 2017 01:28 IST2017-03-22T01:28:47+5:302017-03-22T01:28:47+5:30

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे अयोजित केलेल्या बैठकीत स्वागतयात्रेच्या रुपरेषासंदर्भात आढावा घेण्यात आला.

Visitor's visit to urban and rural areas | स्वागतयात्रेत शहरी अन ग्रामीण ठाण्याचे दर्शन

स्वागतयात्रेत शहरी अन ग्रामीण ठाण्याचे दर्शन

ठाणे : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे अयोजित केलेल्या बैठकीत स्वागतयात्रेच्या रुपरेषासंदर्भात आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे यंदा अबोली रिक्षाचालक देखील स्वागतयात्रेत सहभागी होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी सायकल वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून स्वागत यात्रेत स्मार्ट ठाण्यासह जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण जनजीवनाचा चित्ररथ सहभागी करून घेतला जाणार आहे.
सोमवारी ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, न्यासाचे अध्यक्ष मा.य. गोखले, स्वागताध्यक्ष डॉ. उदय निरगुडकर, निमंत्रक अंजली ढोबळे, मुकेश सावला, संजीव ब्रह्मे, डॉ. अंजली बापट, कविता वालावलकर आदी उपस्थित होते. स्वागतयात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे आश्वासन मढवी यांनी दिले. मावळी मंडळाने आमचे कार्यकर्ते वेळेत हजर राहतील असे आश्वासन दिले. अंगणवाडी सेविका सुवर्णा पिंगोळकर यांनी दीपोत्सवाच्या दिवशी अंगणवाडी कशी चालते याचे प्रात्यक्षिक दाखविण्याची इच्छा व्यक्त केली. यात्रेत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असल्याचे हिंदू जनजागृती प्रणित रणरागिणीच्या सविता लेले यांनी सांगितले. एसटी महामंडळ ग्रुपतर्फे बस आणणार असून त्यांनी एसटी विश्वाचे दर्शन ठाणेकरांना घडेल, असे तनय दांडेकरने सांगितले. सायकल चालवा, प्रदूषण टाळा, इंधन वाचवा असा संदेश देत २५ सायकलप्रेमी सहभागी होणार असल्याचे रिसायकल संस्थेचे मनिष नाखवा यांनी सांगितले. तर शहरी व ग्रामीण भागांतील जनजीवन दाखविणारा चित्ररथ आणि दुचाकीवर पारंपारिक वेशात हेल्मेट घालणार असल्याचे रोटरी क्लब आॅफ ठाणे सेंट्रलच्या ओमकार सावंतने सांगितले. दरम्यान, भाजपचे डॉ. राजेश मढवी यांनी यात्रेसाठी एक लाखांचा धनादेश गोखले यांच्याकडे दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Visitor's visit to urban and rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.